Rashtrapati : करोडपती, लखपती, राष्ट्रपती… या शब्दांच्या पुढे का लावतात पती? जाणून घ्या

कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोलताना केलेल्या एका टिपण्णीमुळे सध्या मोठा गोंधळ माजला आहे. मात्र राष्ट्रपती, करोडपती, लखपती या शब्दांच्या समोर पती हा शब्द नेमका का लावण्यात येतो, याबद्दल जाणून घेऊयात.

Rashtrapati  : करोडपती, लखपती, राष्ट्रपती... या शब्दांच्या पुढे का लावतात पती? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 10:02 AM

कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल केलेल्या एका टिपण्णीमुळे सध्या मोठा गोंधळ माजला आहे. याप्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाकडून याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांनीही कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. “काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. काँग्रेस आदिवासी विरोधी पक्ष आहे. आदिवासी राष्ट्रपती काँग्रेसला सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपतं. काँग्रेसने राष्ट्रपतींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाने द्रौपदी मुर्मूची माफी मागावी”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. सध्या हे प्रकरण भलतेच तापलेले दिसत असून, त्याचे पडसाद संसदेच्या आजच्या कामावरही पडण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

एका मुलाखती दरम्यान कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. त्यावर भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले. चौधरी यांच्या विधानाची भाजपच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. सोशल मीडियावरही याप्रकरणावरून गदारोळ माजला आहे. दरम्यान काल संसदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना घेराव घालून घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे पती शब्दाचा अर्थ ?

या सर्व पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की काही शब्दांच्या पुढे पती हा शब्द का वापरला जातो ? पती या शब्दाचा अर्थ होतो – स्वामी अथवा मालक. अनेक पौराणिक पुस्तकांमध्ये प्रजा-पती, भूपति, वाचस्पती असे शब्द वापरल्याचे आढळून येते. बऱ्याच वेळेला पती या शब्दाचा उपयोग ‘…. चा स्वामी/मालक’ या अर्थाने केला जातो. त्याचप्रमाणे पैशांच्या बाबतीत करोडपती, लखपती असा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ असतो लाखो अथवा करोडो रुपयांचा मालक. हिंदी , इराणी भाषांमध्ये ‘स्वामी’ अथवा ‘मालक’ या शब्दांच्या जागी पती हा शब्द वापरण्यात आल्याचे, अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्कृत, हिंदी , अवस्ताई , फारसी भाषेतही या शब्दाचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. एका लेखातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पती’हा शब्द खूप जुना असून हिन्द- युरोपीय भाषेतून उत्पन्न झाला आहे. ईराणी भाषेतही ‘दमन-पैति’ सारखे शब्द होते. त्याशिवाय पती या शब्दाशी मिळते-जुळते काही शब्द, अनेक भाषांमध्ये असून त्याचा अर्थही स्वामी असाच होतो.

पती प्रत्यय लावण्यात आलेले शब्द :

क्षेत्रपती , करोडपती, लखपती, लक्ष्मीपती, राष्ट्रपती, उद्योगपती , प्रजापती, भूपती, वाचस्पती… इत्यादी.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.