Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिस्कीचा रंग गोल्डन का असतो? हा रंग नैसर्गिक असतो का?

आज आपण व्हिस्की बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, व्हिस्की कोणत्या रंगाची असते? आणि व्हिस्की चा रंग गोल्डन असण्यामागे नेमके काय कारण असते? हा रंग नैसर्गिक असतो का? किंवा मानवनिर्मित आहे.

व्हिस्कीचा रंग गोल्डन का असतो? हा रंग नैसर्गिक असतो का?
जाणून घ्या विस्कीच्या रंगाबद्दलImage Credit source: file
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 9:50 PM

मुंबई : अलीकडे सेलिब्रेशन असो किंवा पार्टी असो त्यामध्ये व्हिस्की(whisky) , वोडका(vodka) किंवा बियर(Beer) प्रामुख्याने तरुण मंडळी सेवन करत असते. हे तिन्ही पदार्थ मद्यपानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या तिघांचा रंग देखील वेगळा असतो, जसे की वोडका क्रिस्टल रंगाची असते तर व्हिस्की गोल्डन रंगाची (golden colour) असते. आज आपण व्हिस्की बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, व्हिस्की कोणत्या रंगाची असते? आणि व्हिस्की चा रंग गोल्डन असण्यामागे नेमके काय कारण असते? हा रंग नैसर्गिक असतो का? किंवा मानवनिर्मित आहे. या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. व्हिस्की चा रंग गोल्डन म्हणजे सोनेरी असण्या मागे एक महत्त्वाची भूमिका असते ते म्हणजे वूडन बॅरेल म्हणजेच लाकडाचा ड्रम. जेव्हा ही व्हिस्की बनवली जाते तेव्हा या व्हिस्की चा रंग क्रिस्टल प्रमाणे म्हणजेच पाण्याच्या रंगासारखा असतो परंतु या व्हिस्कीला अनेक वर्षापर्यंत बॅरेल मध्ये ठेवली जाते ज्यामुळे त्याचा रंग बदलतो. लाकडी ड्रम मुळे याचा रंग हलका पिवळा होऊ लागतो. हा रंग अगदी नैसर्गिक असतो.

खरेतर नेमके घडते असे की, लाकडी ड्रम मध्ये व्हिस्की बनवता असताना व्हिस्की ला थोडेसे टोस्ट केले जाते ज्यामुळे ही व्हिस्की सॉफ्ट होते. अशातच जेव्हा सूर्याचा प्रकाश यावर पडतो तेव्हा लिकर यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.अशावेळी सूर्यप्रकाश लाकडाच्या आत मध्ये शिरतो यामुळे देखील व्हिस्कीचा रंग बदलतो. रात्री लिकर यातून बाहेर पडू लागतो यामुळे टोस्ट केली गेलेली व्हिस्की लाकडातून लिकर चा रंग हळूहळू गोल्डन म्हणजे सोनेरी होऊ लागतो. तसे पाहायला गेले तर व्हिस्की च्या रंगासाठी कॅरॅमल कलर चा वापर केला जातो. त्या रंगाचा वापर करण्याचे कारण की,ही व्हिस्की संपूर्णपणे दारूसारखी दिसायला हवी म्हणून केला जातो.

व्हिस्की चे प्रामुख्याने वेगळे प्रकार देखील आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. मद्य प्रेमी आपल्या आवडी निवडीनुसार व्हिस्की सेवन करत असतात.स्कोच व्हिस्की,सिंगल मॉल्ट ,ग्रेन व्हिस्की,ब्लेंडेड मॉल्ट, ब्लेंडेड,लोलँड मॉल्ट , हायलँड मॉल्ट, स्पेसाईड मॉल्ट असे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात विस्की आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे किंवा घातक आहे याबद्दल अनेक तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार कोणतेही मद्यपान करायला हवे.

टिप्स : वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाहीये किंवा तुम्हाला व्हिस्की पिण्याचे मार्गदर्शन देखील करत नाही.

No Smoking Day : धूम्रपान सोडल्याने वजन वाढतं, नैराश्य येतं? जाणून घ्या काय खरं? काय खोटं?

Election Deposit | निवडणुकीत डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय रं भाऊ?

Law and Order : पोलीस स्टेशनमधलं सगळ्यात मोठं पद कोणतं असतं माहीत आहे? चला जाणून घेऊया!

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.