जगातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस ज्याची खासियत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
तरंगत्या घरांशिवाय भाजीपाला आणि फुलांचा बाजारही पाण्यात तरंगताना दिसतो, पण तुम्ही तरंगत्या पोस्टमनची कधी कल्पना केली आहे का? जर नसेल तर याचा अर्थ तुम्ही अजून जम्मू-काश्मीर नीट पाहिलेले नाही.
वेगवान जगात काही गोष्टी या कधीही बदलू नये असं अनेकांना वाटतं. पण तुम्हाल अशी कोणती गोष्ट आठवतेय का जी कधीच बदलायला नको होती. शेवटच्या वेळी तुम्ही पत्र कधी लिहिले होते हे तुम्हाला आठवतंय का. आजकाल बहुतेक पोस्ट ऑफिस रिकामेच दिसतात. कारण लोकं आता पोस्टात पत्र टाकण्यासाठी जात नाहीत. पण आज पण एक पोस्ट ऑफिस असं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची आठवण होईल. श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे जगातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे.
हजारो पर्यटक देतात भेट
हे 200 वर्षे जुने पोस्ट ऑफिस ब्रिटिश राजवटीत बांधले गेले होते. हाऊस बोटमध्ये असलेल्या या पोस्ट ऑफिसमध्ये एक संग्रहालय देखील आहे.जेथे प्राचीन टपाल तिकिटे संग्रहित करण्यात आली आहेत. डल सरोवराला भेट देणाऱ्या बहुतेक लोकांना हे पोस्ट ऑफिस नक्कीच बघायला आवडते. हजारो पर्यटक येथे येतात आणि सेल्फी घेतात.
टपाल तिकिटावर दल सरोवराची प्रतिमा आहे
हे पोस्ट ऑफिस 2011 पर्यंत नेहरू पार्क पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जात होते, परंतु नंतर भारताच्या माजी पोस्ट मास्टर जनरलने त्याचे नाव बदलून फ्लोटिंग पोस्ट ऑफिस केले. जगातील कोठूनही लोक येथे येतात, त्यांचे प्राधान्य हे आहे की ते प्रथम फ्लोटिंग पोस्ट ऑफिसमध्ये जातील, तेथून कार्ड घेतील आणि त्यावर कॅन्सलेशन स्टॅम्प लावतील. विशेष म्हणजे येथील टपाल तिकिटांमध्ये डल सरोवराची प्रतिमा पाहायला मिळते. एवढेच नाही तर या पोस्ट ऑफिसमध्ये जगभरातील मेल आणि टेलिफोनची सुविधाही उपलब्ध आहे.
भारतीय पोस्टल नेटवर्कचे वैशिष्ट्य
जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क भारतात आहे. येथे सुमारे 1 लाख 55 हजार पोस्ट ऑफिस आणि 5 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. भारतीय पोस्टल नेटवर्कची इतर काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की तरंगते पोस्ट ऑफिस आणि जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस.