भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब टाकला, आतापर्यंत काय-काय घडलं?
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानने भारताच्या या कारवाईनंतर बदला घेण्याची भाषा केली आहे. तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी शांततेतून […]
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानने भारताच्या या कारवाईनंतर बदला घेण्याची भाषा केली आहे. तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी शांततेतून मार्ग काढावा, असं आवाहन काही प्रमुख देशांनी केलंय.
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.
या एअर स्ट्राईकनंतर जगभरातील विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा कळवळा असलेल्या चीनचीही प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त लू कांग यांनी भारत आणि पाकिस्तानला शांततेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. भारत आणि पाकिस्तान दोघेही दक्षिण आशियातले महत्त्वाचे देश आहेत. त्यांनी संबंध सुधारण्यातच दोन्ही देशांचं हित आहे आणि यामुळेच दक्षिण आशियात शांतता राहू शकेल, असं चीनने म्हटलंय.
LIVE UPDATE :
-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात भाषण
- भारतीय वायूसेनेच्या हल्ल्यानंतर जैशचा म्होरक्या मसूद अझहरला पळता भुई थोडी
- केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली, भारताच्या कारवाईची माहिती देणार
- भारताच्या हवाई हल्ल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली माहिती देणार, थोड्याच वेळात पत्रकार परिषद
- भारताच्या बेधडक कारवाईनंतर पाकिस्तानात घबराट
- भारतातून 20 वेगवेगळ्या ठिकाणांहून पाकिस्तानवर हल्ले
- भारताच्या कारवाईत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूदचा मेहुणा ठार
- भारतीय वायूदलाचा अभिमान – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
-
- केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक बैठक सुरु, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह BSF आणि सुरक्षा दलाचे अधिकारी उपस्थित
- पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानची थोड्याच वेळात पत्रकार परिषद लाईव्ह
- कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त केले
-
- पाकिस्तानवरील कारवाईचं ऑपरेशन 100 टक्के यशस्वी झालं – NSA अजित डोवाल
- भारतीय वायूसेनेची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक सुरु, वरिष्ठ अधिकारी उपस्थित
- पाकिस्तानने भारतावर हल्ल्यासाठी F16 विमानं पाठवली होती, मात्र भारतीय सैनिकांना घाबरून माघारी गेले
- भारताची आणखी एक कारवाई, कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचं ड्रोन नष्ट केलं
- पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात दाखल
-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रपती भवनाकडे निघाले
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निरीक्षणात पाकिस्तानवर मोठी कारवाई – सूत्र
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून भारतीय वायूसेनेचे कौतुक
-
- केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली
- पाकिस्तानला चॅलेंज करु नका, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भारताला धमकी
- केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक सुरु, पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, NSA अजित डोवाल उपस्थित
-
- भारतीय वायूसेना आणि सर्व सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर, पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईची शक्यता
- भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची टरकली, पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशीने बोलावली तातडीची बैठक
- संजय राऊत यांनी वायू सेनेचे अभिनंदन केले :
-
- केंद्रीय सुरक्षा समितीची पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरु, मोदींसह महत्त्वाचे मंत्री उपस्थित
-
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारतीय सैन्याचं अभिनंदन
- पाकिस्तानची टरकली, पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु
- भारतीय सैन्याची पाकिस्तानवर सर्वात मोठी कारवाई, 1000 किलोचा बॉम्ब टाकला, 200 ते 300 दहशतवादी ठार
- भारताच्या कारवाईचा व्हिडीओ :
VIDEO : पाकिस्तानवर भारताने 1000 किलोचा बॉम्ब टाकला, भारताच्या कारवाईचा व्हिडीओ#Balakot #Surgicalstrike2 #indianairforce #IndiaStrikesBack #airstrike pic.twitter.com/BH98GhzAF9
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2019
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून भारतीय सैन्याला सलाम
-
- पाकिस्तानवर सर्वात मोठी कारवाई, 200 दहशतवाद्यांचा खात्मा
- संरक्षण मंत्री, गृहमंत्री थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
- एनएसए अजित डोवाल यांनी पाकिस्तानवरील कारवईची पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली
- पुलवामात हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदची ‘अल्फा कंट्रोल 3’ रुम भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त
- व्हिडीओ :
- पुलवामावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं कंट्रोल रुम भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त, 1000 हजार किलोंचा बॉम्ब टाकला
- पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन भारताच्या 12 लढाऊ विमानांची कारवाई, बालकोट भागात 1000 किलोंचा बॉम्ब टाकला
- पाकिस्तानच्या मेजर जनरल असिफ गफूर याने फोटो शेअर केले :
Payload of hastily escaping Indian aircrafts fell in open. pic.twitter.com/8drYtNGMsm
— Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) February 26, 2019
- भारताच्या ‘मिराज-2000’ च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर 1000 किलोचा बॉम्ब टाकला
- पहाटे 3.30 वाजता भारताची पाकिस्तानवर सर्वात मोठी कारवाई
- ‘मिराज 2000’ च्या 10 लढाऊ विमानांनी केली कारवाई
- मुजफ्फराबादच्या बालकोट भागात भारताची कारवाई
IAF Sources: 1000 Kg bombs were dropped on terror camps across the LoC https://t.co/jpC2w5f8X7
— ANI (@ANI) February 26, 2019
- भारतीय सैन्याने 1000 किलोचा बॉम्ब पाकिस्तानवर टाकला, पाकिस्तानविरोधात सगळ्यात मोठी कारवाई
- पाकव्याप्त काश्मिरात भारताचं लढाऊ विमान शिरलं, पाकिस्तानी लष्कराचा भारतावर आरोप
पुलवामा हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.