AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याने शिक्षकावर गुन्हा, जगभरातील 11 विचित्र बंदी

जगभरातील सरकारांकडून अनेक प्रकारच्या बंदी घातल्या जातात. त्यातील काही बंदी इतक्या विचित्र (Weird Bans) असतात की त्या ऐकून अनेकजण अवाक होतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगरमध्ये घडला.

उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याने शिक्षकावर गुन्हा, जगभरातील 11 विचित्र बंदी
Follow us
| Updated on: Sep 22, 2019 | 4:42 PM

नवी दिल्ली: जगभरातील सरकारांकडून अनेक प्रकारच्या बंदी घातल्या जातात. त्यातील काही बंदी इतक्या विचित्र (Weird Bans) असतात की त्या ऐकून अनेकजण अवाक होतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगरमध्ये घडला. मुजफ्फरनगरमध्ये मागील 24 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि भू-माफियांविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या एका शिक्षकावर पोलिसांनी विचित्र कारवाई केली आहे. विजय सिंह या शिक्षकावर पोलिसांनी उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

1. अमेरिकेच्या मिनिसोटा राज्यात एक असाच विचित्र नियम आहे. तेथे महिला आणि पुरुषांची अंतरवस्त्रे एकत्र वाळू घालण्यावर बंदी आहे.

2. द्वितीय विश्व युद्धानंतर 1947 मध्ये जपानने वेश्या व्यवसाय थांबवण्यासाठी एक कायदा केला होता. त्याचं नाव फुवेहो (Feuiho) असं होतं. त्या काळात क्लबला वयोवृद्धांचं मनोरंजनाचं केंद्र मानलं जात होतं. मात्र, मध्यरात्रीनंतर नाचण्यासाठी एक खास परवाना घ्यावा लागायचा. याविरोधात जपानच्या प्रसिद्ध संगीतकार रुइचि सकामोतो यांनी मोहिम सुरु केली होती. त्यानंतर 67 वर्षांनी 2015 मध्ये ही बंदी हटवण्यात आली.

3. रशियामध्ये ईमो ड्रेसिंग फॅशनची मोठी क्रेझ होती. यातून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचेही प्रकार घडले. त्यानंतर रशियात ईमो फॅशनवर बंदी घालण्यात आली.

4. डेन्मार्कमध्ये असलेली बंदी ऐकून तर अनेकांना धक्का बसेल. येथे पालकांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे मुलांचं नाव ठेवता येत नाही. सरकारकडून 7,000 नावांना मंजुरी देण्यात आली आहे. यातीलच एक नाव पालकांनी निवडणं बंधनकारक आहे. पहिलं नाव असं ठेवावं लागतं ज्यातून मुलाच्या लिंगाची ओळख होईल. जर यादीत नसलेले नाव ठेवायचे असेल तर संबंधित पालकांना स्थानिक चर्च आणि सरकारची परवानगी घ्यावी लागते.

5. आपल्याकडे जॉगिंग हा लोकप्रिय व्यायाम प्रकार आहे. मात्र, बुरुंडीमध्ये तुम्ही जॉगिंग करु शकत नाही. मार्च 2014 मध्ये पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये राष्ट्रपतींनी जॉगिंगवर बंदी घातली आहे. लोक जॉगिंग करण्याच्या निमित्ताने असामाजिक कामं करतात असा युक्तीवाद देण्यात येतो.

6. अमेरिकी अभिनेत्री क्लेर डेंसने 1998 मध्ये मनीला येथे कॉक्रोचसारखा वास येतो, असं विधान केलं होतं. याव्यतिरिक्त त्यांनी इतरही काही विवादास्पद वक्तव्य केली. त्यानंतर मनीला शहर व्यवस्थापनाने (सिटी काउन्सिल) त्यांना शहरात येण्यासाठी बंदी घातली.

7. सिंगापूर सरकारने 2004 मध्ये च्युइंग गमवर बंदी घातली होती. च्युइंग गममुळे स्वच्छता आणि साफ-सफाईत अडथळे येतात असा तर्क त्यावेळी देण्यात आला होता.

8. मिलान जेव्हा ऑस्ट्रियाचा भाग होता. तेव्हा तेथे शहरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असणं बंधनकारक होतं. केवळ अत्यंसंस्कार करताना किंवा रुग्णालयातच चेहरा उदास ठेवता येत असे. अन्यथा दंड केला जात. सध्या तेथे हा नियम पाळला जात नाही.

9. इराणमध्ये पश्चिमेकडील प्रकारच्या हेअरस्टाईलवर बंदी आहे. जर कोणत्याही सलूनने हा नियम पाळला नाही, तर त्या दुकानचा परवाना रद्द करण्यात येतो.

10. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन देखील आपल्या देशात विचित्र नियम लागू करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथे पश्चिमी संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी निळ्या रंगाच्या जीन्सवर बंदी आहे.

11. ग्रीस सरकारने ऑनलाइन जुगारावर बंदी घातली आहे. यात कम्प्यूटर आणि मोबाईल फोनवरील सर्व इलेक्ट्रॉनिक गेम्सचाही समावेश आहे. ग्रीस सरकार ऑनलाईन जुगार आणि अन्य व्हिडीओ गेम्समध्ये कोणताही फरक करत नाही. याचा फटका तेथे जाणाऱ्या अनेक पर्यटकांना बसतो. अनेक पर्यटकांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये गेम आढळल्याने दंड ठोठावला गेला आहे. काहींना तुरुंगातही जावे लागले.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.