महिला भाज्या आणायला लोकलमधून जाणार नाहीत; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं

तुमच्याकडे लोकल आहेत. प्लॅटफॉर्म आहेत आणि ट्रेन मॅनेज करणंही तुमच्या हाती आहे. मग तुम्हाला नेमकं हवं आहे काय? ट्रेनचं घोडं का अडवून ठेवलं आहे, असा सवाल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रेल्वेला केला.

महिला भाज्या आणायला लोकलमधून जाणार नाहीत; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 3:12 PM

मुंबई: मुंबईत पहिल्यांदाच लोकल धावणार नाही. किंवा नवीन स्थानकही नाहीत. तुमच्याकडे लोकल आहेत. प्लॅटफॉर्म आहेत आणि ट्रेन मॅनेज करणंही तुमच्या हाती आहे. मग तुम्हाला नेमकं हवं आहे काय? ट्रेनचं घोडं का अडवून ठेवलं आहे? महिला भाज्या खरेदी करण्यासाठी लोकलमधून जाणार नाहीत?, मग एवढी अडवणूक का? अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं. (aslam shaikh on local services for women)

रेल्वेकडून महिलांना लोकलमध्ये प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या टोलवाटोलवीचा अस्लम शेख यांनी समाचार घेतला. मुंबईवरून मजुरांना घरी पाठवत असतानाही रेल्वेने अशीच भूमिका घेतली होती. आताही तशीच भूमिका घेत आहे. रेल्वेतून पहिल्यांदाच प्रवास होत आहेत का? महिलांना रेल्वेतून प्रवासासाठी परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेसोबत बैठका घेतल्या. त्यावर किती महिला लोकलमधून प्रवास करतील याची माहिती देण्यास रेल्वेने सांगितलं. ही माहिती कुणी कुणाला द्यायची?, असा सवाल अस्लम शेख यांनी केला. महाराष्ट्राचं ऐकायचंच नाही, असं धोरण रेल्वेने घेतल्याचं यातून स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले.

महिला लोकलमधून भाजी घ्यायला जाणार नाहीत. कामावर जाण्यासाठीच त्यांना प्रवास करण्याची मुभा हवी आहे. कदाचित रेल्वे मंत्रालयाने सांगितलं असावं म्हणूनच महाराष्ट्राचं ऐकलं जात नसावं, असा आरोपही त्यांनी केला. आपल्याकडे लोकल पहिल्यांदा धावणार नाही. नवीन स्थानकंही नाहीत. सगळं काही स्पष्ट आहे. मग नवीन एसओपी का मागितली जात आहे? नेमकं रेल्वेला हवं तरी काय आहे?, असा सवालही त्यांनी केला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देताना रेल्वेने किती प्रवासी प्रवास करणार हे विचारलं नव्हतं. मग आताच हा प्रश्न का केला जात आहे?, असा सवालही त्यांनी केला. (aslam shaikh on local services for women)

भाजपच्या राज्यांमध्ये सर्व सेवा सुरू आहेत. महाराष्ट्रातच प्रॉब्लेम केला जात आहे. टायमिंग काय असावा?, लोड किती असेल. याची सर्व माहिती अधिकाऱ्यांना आहे. मात्र हे अधिकारी टोलवाटोलवी करत असून सण-उत्सवाच्या काळात लोकल उशिरा सुरू करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.

भाजपला रोजीरोटीची काळजी नाही का?

भाजपवाले धार्मिकस्थळं उघडी करावीत म्हणून मागे लागले आहेत. त्यांना लोकांच्या रोजीरोटीची काळजी नाही का? धार्मिकस्थळांपेक्षाही लोकांच्या रोजीरोटीला पहिलं प्राधान्य असायला हवं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण

Corona Care | कोरोनाला रोखण्यासाठी लोकल ट्रेन बंद करणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…

(aslam shaikh on local services for women)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.