रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri).

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 3:17 PM

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या भाट्ये किनारी समुद्रांच्या लाटांमुळे रत्नसागर बीच रिसॉर्ट जवळ 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे (Coconut tree fall Ratnagiri). सुमद्राचे अतिक्रमण झाले असून लाटांच्या तांडवात नारळाची झाडं उन्मळून पडली आहेत. झाडं पडल्यामुळे जवळपास अर्धा किलोमीटर भागाची धुप झाली आहे. सलग दुसर्‍या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनार्‍यावर हा प्रकार घडला आहे (Coconut tree fall Ratnagiri).

तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील भाट्ये किनार्‍यावर समुद्राच्या भरतीचे पाणी आतमध्ये घुसले होते. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून गेली. भरतीच्या लाटांबरोबर एकापाठोपाठा एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार एका झाडाचे नुकसान अडीच हजार रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचे मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे. गतवर्षी भाट्ये किनार्‍याची अशाचप्रकारे धुप झालेली होती. त्यामुळे येथे सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलणे आवश्यक आहेत.

दरम्यान, नुकतेच कोकणात वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे. वादळामुळे कोकणातील सुपारी, पोफळी, आंब्याची झाडं त्याशिवाय इतर अनेक झाडं पडली आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

Cyclone | रत्नागिरीत सुपारी, पोफळी, आंब्यांची झाडे जमीनदोस्त, राजू शेट्टी म्हणतात…

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत घरावर झाड कोसळलं

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.