Nashik Corona Update: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू; एकाचा मृत्यू, निफाडमध्ये सर्वाधिक 97 रुग्ण

| Updated on: Dec 02, 2021 | 12:00 PM

नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात 97 जण निफाडचे, तर 85 जण सुरगाणा तालुक्यातले आहेत.

Nashik Corona Update: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू; एकाचा मृत्यू, निफाडमध्ये सर्वाधिक 97 रुग्ण
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात 97 जण निफाडचे, तर 85 जण सुरगाणा तालुक्यातले आहेत. दरम्यान, काल 1 डिसेंबर रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 285 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्याचे रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सतत वाढताना दिसत आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 50, बागलाण 11, चांदवड 11, देवळा 06, दिंडोरी 15, इगतपुरी 01, कळवण 06, निफाड 97, सिन्नर 85, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 02, येवला 08 अशा एकूण 293 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 154, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 05 तर जिल्ह्याबाहेरील 15 रुग्ण असून असे एकूण 467 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 477 रुग्ण आढळून आले आहेत.

अन्यथा निर्बंध

सध्या जगभरात ओमिक्रॉनची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष व्हावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. सुरक्षित अंतराचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क वापरावे. लसीकरणाकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉनचे 32 म्यूटन्ट आहेत. त्यात लगेच निर्बंध घातले जाणार नाहीत. मात्र, संख्या वाढल्यास निर्बंध लादावे लागतील, असा देण्यात आला आहे.

लसीकरणाशिवाय प्रवेश नाही

साहित्य संमेलनाच्या ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश नाही. संमेलन स्थळी लसीकरणाची सुविधा असेल. फास्ट ट्रॅक प्रमाणे दोन प्रवेश द्वार असतील. 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश, तर डोस न घेतलेल्यांनाच जागेवरच डोस देण्यात येणार आहे. ताप असेल तर तपासणी करूनच संमेलनाला यावे. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांनी येऊ नये. परिसंवादात येणाऱ्या वक्त्यांना देखील दोन डोस अनिवार्य केले आहेत. मास्कशिवाय साहित्य संमेलन स्थळी प्रवेश नाही. मास्क संमेलन स्थळी फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश

आले निमंत्रकांच्या मना…चक्क साहित्य संमेलनाध्यक्षांचे कथाकथन रद्द; संवादावर बोळवण, इतरांचे पुसूच नका…!

हायकोर्टाच्या सुनावणीपूर्वीच मॉडर्न कॅफे जमीनदोस्त; नाशिकमध्ये महापालिका आयुक्तांची वादग्रस्त कारवाई