Sexual Health | हे 6 रोग करु शकतात तुमची सेक्स लाईफ खराब, सावध राहा!
आपल्या पार्टनरसोबत चांगली सेक्सलाईफ (Sex Life) असणं वैवाहिक आयुष्यात गोडवा घेऊन येतं. शिवाय शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ( Physical and mental health ) हे अत्यंत गरजेचं मानलं जातं.
आपल्या पार्टनरसोबत चांगली सेक्सलाईफ (Sex Life) असणं वैवाहिक आयुष्यात गोडवा घेऊन येतं. शिवाय शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ( Physical and mental health ) हे अत्यंत गरजेचं मानलं जातं. सेक्समुळे तुमचं आरोग्यही सुदृढ राहतं. (Helth Tips) मात्र, सध्याच्या काळातील अनेक रोगांचा थेट परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होत असतो. त्यामुळं या रोगांना दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जरी हे रोग झाले, तरी त्यांना नियंत्रणात ठेवणंही महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच रोगांची माहिती घेऊया, जे रोग तुमची सेक्स लाईफ खराब करु शकतात. ( 7 diseases that can ruin your sex life )
01. मधुमेह किंवा डायबेटीज – ( diabetes )
मधुमेहामुळे पुरुषामध्ये लिंगामध्ये ताठरता न येणं किंवा शुक्राणूंच्या कमीची समस्या येऊ शकते. हाय ब्लड शुगरचा थेट परिणाम तुमच्या रक्त वाहिन्या आणि नसांवर होतो. त्यामुळं सेक्स ऑर्गनसाठी लागणारा आवश्यक रक्त पुरवठाही कमी होतो. महिलामध्ये वजायनल ड्रायनेस म्हणजेच योगीमार्ग कोरडा पडणं, पेनफूल इंटरकोर्स वा लैंगिक इच्छेची कमी या समस्या उद्भवू शकतात. आरोग्यदायी फळभाज्या, कडधान्य आणि इतर आहाराचं सेवण हाच या समस्येवरील उपाय आहे. शिवाय नियमित व्यायामही अत्यंत गरजेचा आहे.
02. क्रॉनिक पेन- ( chronic pain )
शरीराच्या कुठल्याही भागात वेदनादायी दुखणं वा क्रॉनिक पेनसुद्धा तुमच्या सेक्सुअल डिजायरमध्ये कमी आणू शकतो. क्रॉनिक पेन कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषध देतात, त्याचा परिणाम लवकर होतो. मात्र, यातील काही औषधांमुळेसुद्धा सेक्सअल लाईफवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानं ही औषधं घ्यावी
03. हृदयरोग- ( Heart Problems )
जर तुम्हाला हृदयरोग वा त्यासंबंधित इतर त्रास असतील तर त्याचा थेट परिणाम सेक्स लाईफवर होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला काहीच काळापूर्वी हृदयरोगाचा झटका आला असेल, तर सेक्सपासून काहीकाळ दूरच राहा. कारण, सेक्स दरम्यान पुन्हा हृदयरोगाची समस्या बळावू शकते
04. तणाव किंवा डिप्रेशन – ( depression )
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव किंवा डिप्रेशनचा सर्वांनाच पाहायला मिळतो. ही एक मानसिक स्थिती आहे, जी तुमच्या शारीरीक आयुष्यावरही परिणाम करत असते. तुम्ही कायम निराश राहता, आणि यातून बाहेर पडण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. अशावेळी डॉक्टर तुम्हाला काही औषधं देतात, ही औषधंही तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करु शकते. यामुळे तुमची सेक्स करण्याच्या इच्छेत कमी येऊ शकते. अशा त्रासांमध्ये औषधांचं प्रमाण घटवणं वा डॉक्टरांच्या सल्ल्यानं सेक्स लाईफवर परिणाम न करणारी औषधं घेणं हा एक पर्याय असू शकतो. मात्र, या सगळ्यांत डॉक्टरांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.
05. अर्थरायटिस – ( arthritis )
संधीवात हा चांगल्या सेक्स लाईफमधला एक मोठा अडसर ठरु शकतो. सांधेदुखी वा शरीराच्या जोडांमध्ये दुखणं हे तुमची सेक्स लाईफ खराब करु शकतं. कारण, सेक्स करण्यासाठी शरीराची हालचाल अत्यंत महत्त्वाची असते, मात्र, संधीवातात शरीराची हालचाल केल्यास, भयानक वेदना होतात, त्यामुळे सेक्सची इच्छा मरते, शिवाय, आपला पार्टनरही यामुळे निराश होऊ शकतो.
06. लो टेस्टोस्टेरॉन आणि मोनोपॉज- ( low testosterone and menopause )
टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषांच्या सेक्स लाईफसाठी अत्यंत गरजेचं असतं. शरीरातील टेस्टोस्टेरॉनची चांगली मात्रा, चांगल्या सेक्ससाठी अत्यंत गरजेची असते. मात्र, वाढत्या वयासोबत टेस्टोस्टेरॉन निर्मितीही कमी होते आणि त्यामुळे पुरुषांमध्ये कामेच्छा मरते. शिवाय महिलामध्ये वयाच्या चाळीसीनंतर मोनोपॉजचा त्रास सुरु होतो. त्यामुळे त्यांनाही सेक्सची इच्छा राहत नाही. त्यामुळं महिलांमध्ये वजायनल ड्रायनेस म्हणजेच योनीमार्ग कोरडा पडणे, कामेच्छा मरणे वा इतर समस्या उद्भवतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं.
संबंधित बातम्या:
Health | थायरॉईडच्या समस्येने त्रस्त आहात? ‘या’ योगासनांनी मिळेल आराम
Weight Loss | वजन नियंत्रणासाठी ‘चालणे’ उत्तम व्यायाम, कॅलरी कमी करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
हिवाळ्यात वारंवार ‘उच्च रक्तदाबा’ची समस्या उद्भवतेय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!
( 7 diseases that can ruin your sex life )