नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

नाशिकमध्ये (Nashik)येत्या गुरुवारपासून (9 सप्टेंबर) कडक हेल्मेटसक्ती (helmets enforced) मोहीम राबवण्याचा निर्धार पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे. दरम्यान, चांदवडहून (Chandwad accident) धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव - धुळे रस्त्यावर रविवारी रात्री (5 सप्टेंबर) एक वाजता अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 3:01 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) येत्या गुरुवारपासून (9 सप्टेंबर) कडक हेल्मेट सक्ती (helmets enforced) मोहीम राबवण्याचा निर्धार पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, चांदवडहून (Chandwad accident) धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर रविवारी रात्री (5 सप्टेंबर) एक वाजता अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (9 two-wheelers killed in Nashik accident in August, two killed in Chandwad accident on Sunday, Tight helmets enforced by police from Thursday)

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. मात्र, हेल्मेटधारकांनी या मोहिमेलाही फाटा दिला. फक्त पेट्रोल घेण्यापुरते पेट्रोल पंपावरच हेल्मेट घालणे सुरू केले आहे. हे चित्र पाहता येत्या गुरुवारपासून हेल्मेट सक्ती मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. या टप्प्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

वाहतूक नियमांचे पालन नाही

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पाचशे रुपयांचा दंड

विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यास पाचशे रुपये, ट्रिपल सीट प्रवास करण्यास दोनशे रुपये, सिग्नल तोडणाऱ्यास दोनशे रुपये, राँगसाइड वाहन चालवणाऱ्यास पोलिस हजार रुपयांचा दंड आकारतात. मात्र, अनेक नागरिक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. दंड ठोठावला तरी पोलिसांशी हुज्जत घालतात. तर अनेक ठिकाणी पोलिसच तोडपाणी करून वाहनधारकाला सोडून देतात.

चांदवडचे दोघे अपघातात ठार

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर रविवारी रात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. सागर ज्ञानेश्वर ठाकरे (वय 26, रा. चांदवड), स्वप्नील राजाराम ठाकरे (वय 30, रा. चांदवड) अशी मृतांची नावे आहेत.

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांच्या अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. त्यामुळे हेल्मटसक्ती अधिक कडक करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी. आपल्यामागे घरात कोण आहेत याचा विचार करावा आणि हेल्मेट घालूनच शहरात प्रवास करावा. जे हेल्मेट घालणार नाहीत, त्यांचे केंद्रावर नेऊन दोन तास समुपदेशन करण्यात येईल. – दीपक पांडेय, पोलिस आयुक्त, नाशिक

(9 two-wheelers killed in Nashik accident in August, two killed in Chandwad accident on Sunday, Tight helmets enforced by police from Thursday)

संबंधित बातम्याः

नाशकात तोतया विधानसभा उपाध्यक्षाला बेड्या

VIDEO : टोमॅटोनं पिकअप खच्चून भरला, चढावर पलटी होता-होता वाचला, व्हिडीओ पाहा

नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.