1 जानेवारीपासून GST चा नियम बदलणार, 45000 व्यापाऱ्यांवर होणार परिणाम
देशातील 45 हजार व्यापारी नव्या नियमांमध्ये मोडत आहेत. या व्यापाऱ्यांना 1 टक्के जीएसटी हा रोकडा भरावा लागणार आहे.
नवी दिल्ली : वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) नुकतंच 50 लाखाहून अधिक मासिक टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना 1 टक्के जीएसटी हा कॅशमध्ये भरणं अनिवार्य (GST new rule) केलं होतं. बनावट बिलांद्वारे होणाऱ्या कराची चोरी रोखण्यासाठी हा नियम जारी करण्यात आला होता. यामध्ये मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, देशातील 45 हजार व्यापारी नव्या नियमांमध्ये मोडत आहेत. या व्यापाऱ्यांना 1 टक्के जीएसटी हा रोकडा भरावा लागणार आहे. (a 45000 merchant will come under ambit of gst cash payment rules)
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम (GST Cash Payment rule) 1 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. तर नवीन नियमांतर्गत, एकूण व्यवसाय नोंदणींपैकी फक्त 0.37 टक्के करदाता आहेत. महसूल विभागानं यासंबंधी माहिती दिली आहे. सीबीआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, एका महिन्यात करपात्र पुरवठा करण्याचं मूल्य 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर कोणतीही नोंदणीकृत व्यक्ती इलेक्ट्रॉनिक पत खात्यात उपलब्ध असलेली रक्कम 99 टक्क्यांहून अधिक कर भरण्यासाठी वापरु शकत नाही.
जीएसटीचे रजिस्टर्ड करदाते 1.2 कोटी आहेत
जीएसटीचे देशभरात एकूण 1.2 कोटी नोंदणीकृत करदाते आहेत. यापैकी 4 लाख असे करदाते आहेत ज्यांचे मासिक पुरवठा मूल्य l50 लाखाहून अधिक आहे. यापैकी 1.5 लाख करदाता हे कराच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम भरतात.
दरम्यान, जर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी किंवा कोणत्याही भागीदाराने मागच्या आर्थिक वर्षात न वापरलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटवर एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कर भरला किंवा नोंदणीकृत व्यक्तीने एक लाखाहून अधिक रकम परतावा मिळवला तर त्यांना यामध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही.
इतर बातम्या –
स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करायची? जाणून घ्या SBI आणि PNB ची नवी योजना
बँकेचं लायसन्स रद्द झालं, तर तुमच्या पैशाचं काय होईल? जाणून घ्या नियम
Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा
(a 45000 merchant will come under ambit of gst cash payment rules)