झाडींमधून येत होता बाळाच्या रडण्याचा आवाज, जवळ जाताच गावकरी हादरले

मंगळवारी सकाळी स्थानिकांना झुडूपांमधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. जेव्हा झाडीत शिरून पाहिलं तेव्हा गावकऱ्यांना धक्काच बसला.

झाडींमधून येत होता बाळाच्या रडण्याचा आवाज, जवळ जाताच गावकरी हादरले
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 12:12 PM

पानीपत : आईसारखी माया कोणामध्ये नाही असं म्हणतात. पण याच मायेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवजात अर्भकाला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून झुडूपांमध्ये फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी स्थानिकांना झुडूपांमधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. जेव्हा झाडीत शिरून पाहिलं तेव्हा गावकऱ्यांना धक्काच बसला. (a 6 day newborn baby found alive in the trees haryana panipat)

मंगळवारी सकाळी गावात नेहमीसारखा दिवस सुरू झाला. पहाटेच्या वेळी ग्रामस्थांना झुडूपांमधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. यानंतर सगळ्यांनी झुडूपांमध्ये बाळाचा शोध घेतला असता, काटेरी झुडूपांमध्ये बाळाला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकून दिल्याचं दिसलं. नागरिकांनी तातडीने बाळाला पिशवीतून बाहेर काढलं आणि पोलिसांना पाचारण करत अर्भकाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील हथवाला गावातील आहे. हथवाला पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या अर्भकाची प्रकृती ठीक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. एका नुकत्याच जन्मलेल्या गोड बाळाला अशा प्रकारे झुडूपांमध्ये फेकून दिल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर असा गंभीर प्रकार कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत. (a 6 day newborn baby found alive in the trees haryana panipat)

प्लॅस्टिकच्या पिशवीत काट्यांमध्ये होतं अर्भक प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास झुडूपांमधून एका बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. अनेकांनी या गोष्टीला टाळलं. पण नंतर मोठ्याने आवाज येऊ लागला आणि बाळ सतत रडत होतं. त्यामुळे गावातील काहींनी पुढाकार घेत झाडीत शिरले आणि रडणाऱ्या बाळाचा कानोसा घेतला. यावेळी बाळ एका काटेरी झुडूपांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलं होतं. यानंतर तातडीने बाळाला बाहेर काढलं आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं.

आरोपी महिलेचा तपास सुरू 9 महिने आपल्या पोटात वाढवून आईनं बाळाला काट्यात कसं सोडलं? अशा चर्चा सध्या गावात सुरू आहे. तर पोलिसही आरोपी आईचा शोध घेत आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच गर्भवती झालेल्या महिलांचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ अगदी 5 ते 6 दिवसांचं आहे. तर बाळाचीही कोरोना चाचणी होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या – 

Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक

(a 6 day newborn baby found alive in the trees haryana panipat)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.