Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये फोटो चांगला दिसत नाही, असा करा अपडेट, संपूर्ण प्रक्रिया काय?

आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना UIDAI अर्थात भारतीय अनोखी ओळख प्राधिकरण, आधार क्रमांक जारी करणारी संस्था यांच्या वतीने मोबाईल नंबरसह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते. अनेकांना त्यांच्या आधार कार्डमधील फोटो आवडत नाही. अशा परिस्थितीत तो खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे आधारकार्डमध्ये आपला फोटो बदलू किंवा अपडेट करू शकतो.

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये फोटो चांगला दिसत नाही, असा करा अपडेट, संपूर्ण प्रक्रिया काय?
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 5:12 PM

नवी दिल्ली : आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळख पुरावा आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे. बँक खाते उघडायचे की कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा, आधार मिळवायचा की एलपीजी सिलिंडरचे अनुदान घ्यायचे, आधार क्रमांकाची जवळपास सर्वत्र मागणी असते. म्हणूनच तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणे आणि ते तुमच्या मोबाईल फोन क्रमांकाशी जोडणे महत्त्वाचे आहे.

अनेकांना त्यांच्या आधार कार्डमधील फोटो आवडत नाही

वेळोवेळी आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना UIDAI अर्थात भारतीय अनोखी ओळख प्राधिकरण, आधार क्रमांक जारी करणारी संस्था यांच्या वतीने मोबाईल नंबरसह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते. अनेकांना त्यांच्या आधार कार्डमधील फोटो आवडत नाही. अशा परिस्थितीत तो खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे आधारकार्डमध्ये आपला फोटो बदलू किंवा अपडेट करू शकतो. आधार कार्डमध्ये फोटो बदलण्याची कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया नसल्याने तुम्ही जवळच्या आधार नावनोंदणी केंद्राला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता.

तुमचा फोटो आधार कार्डमध्ये कसा अपडेट करायचा?

>> सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. फॉर्म काळजीपूर्वक भरा. >> आता तुमच्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जा आणि हा फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक तपशील द्या. >> फॉर्म घेतल्यानंतर कार्यकारी तुमचा थेट फोटो कॅप्चर करेल आणि सिस्टममध्ये अपडेट करेल. >> तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला रु. 25+ जीएसटी शुल्क इथे भरावे लागेल.

आधारकार्ड खरे किंवा खोटे आहे हे कसे ओळखाल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा. * पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. * त्यानंतर कॅप्चा कोड टाका. * यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा. * तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. * याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

मास्क्ड आधारकार्ड म्हणजे काय?

eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. मास्क्ड आधार कार्डावर केवळ शेवटचे चार क्रमांक दिसतात. तुम्ही हव्या त्या प्रकारे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता.

संबंधित बातम्या

Gold Rate Today : सोने विक्रमी स्तरापासून अजूनही 9697 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

ATM मधून फाटक्या नोटा बाहेर आल्यात, जाणून घ्या, बँकेतून कशा बदलायच्या?

Aadhar Card Update: Photos in Aadhar card do not look good, update it, what is the whole process?

धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....