मराठी शिकवणारा गुरु हरपला, सुहास लिमयेंच्या निधनाने आमिर खान भावविवश

तुम्ही फक्त मराठीच नाही, तर इतर गोष्टीही शिकवल्यात. तुमची नेहमी आठवण येईल, अशा भावना आमिर खानने व्यक्त केल्या आहेत.

मराठी शिकवणारा गुरु हरपला, सुहास लिमयेंच्या निधनाने आमिर खान भावविवश
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 5:08 PM

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेला अभिनेता आमिर खान याला मराठीचे धडे गिरवणारे ज्येष्ठ भाषा अभ्यासक सुहास लिमये यांचे निधन झाले. सैफी रुग्णालयात उपचार सुरु असताना वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आमिर खानने सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Aamir Khan Mourns his Marathi Language Teacher Suhas Limaye Death)

सुहास लिमये हे संस्कृत पंडित म्हणून प्रख्यात होते. अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले होते. संस्कृत आणि मराठीसोबतच हिंदी-इंग्रजी या भाषांचाही त्यांना व्यासंग होता.

आमिरने ट्विटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “माझे मराठीचे गुरु सुहास लिमये यांचे काल निधन झाल्याचे वृत्त ऐकून मला अतीव दु:ख होत आहे. सर, तुम्ही माझ्या उत्तम शिक्षकांपैकी एक होतात. तुमच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण मी आनंदात घालवला आहे. तुमचे कुतूहल, शिकणे आणि शेअर करण्याच्या इच्छेमुळेच तुम्ही उत्तम गुरु झालात” असे आमिर म्हणतो.

“तुमच्यासह घालवलेली चार वर्षे अविस्मरणीय होती. तो प्रत्येक क्षण माझ्या स्मृतीत कैद आहे. तुम्ही फक्त मराठीच नाही, तर इतर गोष्टीही शिकवल्यात. तुमची नेहमी आठवण येईल.” अशा भावना आमिर खानने व्यक्त केल्या आहेत. आमिर सध्या खान तुर्कस्तानमध्ये आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ या सिनेमाचे तो चित्रीकरण करत आहे.

(Aamir Khan Mourns his Marathi Language Teacher Suhas Limaye Death)

दरम्यान, आमिर खानची दीर्घकाळापासून साथ देणारे सहाय्यक आमोस यांचे मे महिन्यातच निधन झाले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर आमोस यांची प्राणज्योत मालवली होती. त्यावेळीही आमिर खान आणि त्याची पत्नी-दिग्दर्शिका किरण राव यांना मोठा धक्का बसला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर आमिर खान, किरण राव आणि टीमने धावाधाव करत त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शाहरुखचा मराठमोळा वाहनचालक कालवश

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या वाहनचालकाचे निधन झाले. मूळ अकोल्याचे रहिवासी असलेल्या मोहन झिंगूजी डोंगरे यांची किडनीच्या विकाराने प्राणज्योत मालवली. 1989 पासून ते वाहनचालक म्हणून शाहरुखच्या कुटुंबाकडे कामाला लागले होते. जवळपास तीस वर्षांपासून ते खान परिवाराचे सदस्य झाले होते. खान परिवाराने मोहन डोंगरे यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही.

संबंधित बातम्या :

अकोल्याचा ‘मोहन’ ते किंग खानचा ‘शूमाकर’, शाहरुखच्या मराठमोळ्या ड्रायव्हरचे निधन

25 वर्षांची साथ सुटली, आमिर खानच्या सहाय्यकाचं निधन

(Aamir Khan Mourns his Marathi Language Teacher Suhas Limaye Death)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.