Bobby Deol | इतक्या वर्षांनी अभिनेता बॉबी देओलचे धमाकेदार ‘कमबॅक’, पापा धर्मेंद्र खुश!

‘आश्रम’ या वेब सीरीजच्या (Aashram) माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला.

Bobby Deol | इतक्या वर्षांनी अभिनेता बॉबी देओलचे धमाकेदार ‘कमबॅक’, पापा धर्मेंद्र खुश!
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 5:17 PM

मुंबई : ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या (Aashram) माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबी देओलची वेब सीरीज ‘आश्रम’चा दुसरा सीझन 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजचा पहिला भाग ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना आवडला आणि त्याला खूपच पसंती मिळाली. बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली आश्रम वेब सीरीज बॉबी देओलचे वडील म्हणजेच धर्मेंद्र खूप आवडली आहे.(Aashram 2 Actor Bobby Deol Comeback Dharmendra Happy) Ashram

काही दिवसांपूर्वी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉबी देओलने सांगितले की, माझी आश्रम वेब सीरीजमधील काही भाग माझे वडील धर्मेंद्र यांनी बघितले आणि त्यांना ते खूप आवडले. आश्रम वेब सीरीजमध्ये मी खूप छान काम करत असल्याचे देखील ते म्हणाले. असेच काम करत राहा, म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिले.बॉबी देओलने कमबॅक केल्यामुळे धर्मेंद्र खूपच खुश आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉबी देओलला काम मिळत नव्हते.

बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितले होते की ‘रेस 3’ आणि ‘हाऊसफुल 4’नंतर तरुणांनी मला ओळखण्यास सुरुवात केली आहे. त्यांना कळले की, बॉबी देओल नावाचा एक अभिनेता देखील आहे. मला त्याचा फायदा झाला. ‘रेस 3’ व ‘हाऊसफुल 4’ नंतरच मला आश्रम वेब सीरीजची ऑफर मिळाली.

आश्रम वेब सीरीज बोलायचे झाले तर, आश्रममध्ये लपवलेले गुन्हे आणि भ्रष्टाचाराच्या भोवती या वेब सीरीजची कथा फिरत आहे. बॉबी काशीपुरवाले बाबा निरालाच्या भूमिकेत आहे. आतापर्यंत ‘आश्रम’ या वेब सीरीजने अनेक रेकॅार्ड आपल्या नावे नोंदवले आहेत. आश्रम वेब सीरीजचे पहिले पर्व 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले होते. ही सीरीज वेब  8 भागांची असून, ती प्रेक्षकांच्या पसंतीस आहे. मात्र, 8 भाग होऊनही कथा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल कायम आहे.

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनावर मात्र संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Case | जामिनासाठी पुन्हा खटाटोप सुरू, शौविक चक्रवर्तीकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल!

Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली…

(Aashram 2 Actor Bobby Deol Comeback Dharmendra Happy)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.