AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मतभेद, ना आर्थिक चणचण, मयुरीचा पती आशुतोषच्या आत्महत्येचं कारण काय.?

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. Aashutosh Bhakre suicide update

ना मतभेद, ना आर्थिक चणचण, मयुरीचा पती आशुतोषच्या आत्महत्येचं कारण काय.?
फोटो - फेसबुक
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 8:43 PM

नांदेड : अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अवघ्या 32 व्या वर्षी आशुतोषने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आशुतोषने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण पोलीस तपासात समोर येईल. (Mayuri Deshmukhs husband Aashutosh Bhakre suicide update)

आशुतोषने आज सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवलं, अशी माहिती कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी दिली. आशुतोषला नेमकं कोणतं नैराश्य होतं, याबाबत आता तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री मयुरी देशमुख ही खुलता कळी खुलेना या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख हे 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच असल्याचं समजतंय. दोघांमध्ये ना मतभेद होते, ना दोघांना आर्थिक चणचण होती, त्यामुळे आशुतोषने आत्महत्या का केली, असा प्रश्न मित्रपरिवाराला पडला आहे.

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिलं. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

आशुतोष भाकरेने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘जुन-जुलै’ या बहुचर्चित नाटकाची निर्माती त्याने केली. ‘खुलता कळी खुलेना’ या गाजलेल्या मालिकेची नायिका मयुरी देशमुख ही त्यांची पत्नी आहे. (Aashutosh Bhakre suicide update)

संबंधित बातम्या 

Ashutosh Bharke Suicide | अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास 

पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.