ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा, अभिषेक बच्चनची पोस्ट व्हायरल, म्हणाला, ‘मूर्खपणाशी लढण्याचे शस्त्र म्हणजे…’

Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होणार घटस्फोट? घटस्फोटाची चर्चा जोर धरत असताना अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला, 'मूर्खपणाशी लढण्याचे शस्त्र म्हणजे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा...

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा,  अभिषेक बच्चनची पोस्ट व्हायरल, म्हणाला, 'मूर्खपणाशी लढण्याचे शस्त्र म्हणजे...'
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 3:21 PM

Abhishek Bachchan – Aishwarya Rai: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक याची एका पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करत अभिषेक याने सांगितलं आहे की, ‘मूर्खपणा’ला सर्वात अचूक उत्तर कोणतं असू शकतं? इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चन याने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि कॉमन सेंसवर मोठं वक्तव्य केलं. सध्या अभिनेत्याची पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे.

मूर्खपणाशी लढण्याचे शस्त्र म्हणजे कॉमन सेन्स… अशी पोस्ट अभिनेत्याने केली होती. अभिषेक बच्चन म्हणाला होता, ‘सध्या एआय ट्रेंडमध्ये आहे… मूर्खपणाचं सर्वात उत्तम उत्तर म्हणजे कॉमन सेन्स… कॉमन सेंस एका डिओडोरेंट प्रमाणे आहे. ज्या लोकांना याची सर्वात जास्त गरज असते, ते याचा वापर कधीच करत नाहीत…’ अशी पोस्ट अभिनेत्याने केली होती.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. म्हणून अभिनेत्याच्या जुन्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, अभिषेक बच्चन याच्या नावाची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत होत आहे. अभिषेक आणि निम्रत कौर यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात निम्रत हिने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. निम्रत हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही काळ एमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आता ऐश्वर्या कायम अनेक ठिकाणी आराध्या हिच्यासोबत दिसते… तर अभिषेक याला कुटुंबासोबत स्पॉट केलं जातं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.