मोदींच्या ‘बूस्टर डोस’ने औरंगाबादेत लसीकरण सुसाट, जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा, चार दिवसात 1 लाखावर डोस

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तब्बल एक लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरीही उद्दिष्टाच्या तुलनेत अजून पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 24 टक्केच आहे.

मोदींच्या 'बूस्टर डोस'ने औरंगाबादेत लसीकरण सुसाट, जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा, चार दिवसात 1 लाखावर डोस
औरंगाबादमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा गावोगावी दौरा
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 10:51 AM

औरंगाबादः देशात लसीकरणात (Corona Vaccination) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunul Chavan) यांच्याशी बातचित केली होती. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या औरंगाबादेत लसीकरण मागे पडणे ही खूप गंभीर बाब असल्याचं त्यांनी बैठकीत म्हटलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचंड वेगाने सूत्रे हालवत संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरातील महापालिका (Aurangabad Municipal corporation) क्षेत्रांमध्ये लसीकरण सक्तीसाठी नियम बनवले. प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आल्यामुळे ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील चार दिवसातच औरंगाबादमध्ये 1 लाख जणांना लस देण्यात आली.

लसीकरण जोमात, उद्दीष्ट आणखी दूरच

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तब्बल एक लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरीही उद्दिष्टाच्या तुलनेत अजून पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 24 टक्केच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लस न घेणाऱ्यांवर अनेक ठिकाणी निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी खेड्यात, मनपा घरोघरी

जिल्ह्यासाठीचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. महापालिकेने ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत 52,149 घरांचे सर्वेक्षण केले. तर अनेकांच्या घरी फोन करून लसीकरणाबाबत विचारपूस करण्यात आली. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी खुलताबाद तालुक्यातील गल्लोबोरगावात जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. एका शेतकऱ्याकडे मुक्कामही केला.

अजून 13 लाखांचे लसीकरण बाकी

औरंगाबाद शहरातील 10 लाख 55 हजार 654 आणि ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 एवढ्या म्हणजेच एकूण 32 लाख 24 हजार 677 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 18 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच अजूनही जिल्ह्यातील 13 लाख 32 हजार 31 लोकांनी लस घेतलेली नाही. जिल्ह्यात फक्त 24.86 टक्के लोकांचेच दोन्ही डोस झाले आहेत. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

इतर बातम्या-

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.