अभिनेते महेश आनंद यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि निर्माते महेश आनंद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. ते 57 वर्षांचे होते. मुंबईतील वर्सोवा येथे महेश आनंद राहत होते. तेथील घरीच त्यांचा मृतदेह आढळला. महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, उद्या पोस्टमार्टम केले जाणार आहे. त्यानंतरच महेश आनंद यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल. अभिनेते महेश […]

अभिनेते महेश आनंद यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि निर्माते महेश आनंद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. ते 57 वर्षांचे होते. मुंबईतील वर्सोवा येथे महेश आनंद राहत होते. तेथील घरीच त्यांचा मृतदेह आढळला. महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, उद्या पोस्टमार्टम केले जाणार आहे. त्यानंतरच महेश आनंद यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल.

अभिनेते महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती मिळताच, हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली. 80 आणि 90 च्या दशकात महेश आनंद यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका लोकप्रिय केल्या. मजबूर, स्वर्ग, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार यांसारखे अनेक सिनेमांमध्ये महेश आनंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकतेच अभिनेते गोविंदा यांच्या ‘रंगीला राजा’ सिनेमातून कमबॅकही केले होते.

अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत महेश आनंद यांनी सिनेमांमध्ये काम केले आहे.

महेश आनंद हे वर्सोव्यातील घरी एकटेच राहत होते. त्यांची पत्नी 2002 पासून वेगळी राहत होती. त्यामुळे महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पत्नीलाही नव्हती. महेश आनंद हे आर्थिक अडचणीत होते, अशीही माहिती निकटवर्तीयांनी सांगितली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.