धक्कादायक… पतीचे प्राण वाचवायला गेलेल्या अभिनेत्रीवर गोळीबार

काळ पतीचा आला होता, पण पत्नी जीवाला मुकली... अज्ञातांकडून अभिनेत्रीवर गोळीबार

धक्कादायक... पतीचे प्राण वाचवायला गेलेल्या अभिनेत्रीवर गोळीबार
धक्कादायक... पतीचे प्राण वाचवायला गेलेल्या अभिनेत्रीवर गोळीबार
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 4:24 PM

Actress Isha Alia Death : जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी चोरट्यांनी एका कुटुंबावर हल्ला केला. लूटमार करत असलेल्या चोरट्यांना कुटुंबाने विरोध केल्यामुळे कुटुंबातील महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली. गोळीबारात मृत पावलेल्या महिलेची ओळख झारखंड येथील अभिनेत्री ईशा आलिया उर्फ रीता कुमारी म्हणून झाली आहे. अभिनेत्री ईशा पती प्रकाश कुमार आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत रंचीहून कोलकाता येथे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये राहणारी अभिनेत्री ईशा आलिया तिच्या पती आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत कारमधून राष्ट्रीय राजमार्ग – 16 वरून कोलकाता याठिकाणी जात असताना अभिनेत्रीचा पती शैचालयासाठी थांबला. तेव्हा तीन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याला घेरलं आणि त्यांची लूटमार करू लागले.

पतीला चोरट्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी अभिनेत्री गाडीतून बाहेर आली. तेव्हा तीन चोरट्यांनी अभिनेत्रीवर गोळीबार केला. यानंतर पत्नीला वाचवण्यासाठी प्रकाश कुमार मतदीच्या शोधात तीन किलोमीटर पळत राहिले. तेव्हा गावकऱ्यांच्या मदतीने प्रकाश यांनी पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी अभिनेत्रीला मृत घोषित केलं.

सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. जेव्हा पोलिसांनी ईशा आलियाच्या पतीची चौकशी केली, तेव्हा गोळीबारात मृत पावलेली महिला अभिनेत्री असल्याची माहिती मिळाली. अभिनेत्रीचं खरं नाव रीता कुमारी असं आहे. पण तिचं स्क्रिनवर नाव ईशा आलिया असं आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.