Aditya Narayan | आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे सोहळे सुरू, फोटो शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!
बॉलिवूड गायक आदित्य नारायण उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी मैत्रीण श्वेता अग्रवाल हिच्यासोबत लग्नाच्या बंधणात अडकणार आहे.
मुंबई : बॉलिवूड गायक आदित्य नारायण उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी मैत्रीण श्वेता अग्रवाल हिच्यासोबत लग्नाच्या बंधणात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने आपल्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. आता त्याचा तिलक सेरमनीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिलक सेरमनीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर केला गेला आहे. (Aditya naraya and shweta wedding ceremony)
View this post on Instagram
कोरोनामुळे आदित्य आणि श्वेताचा लग्नात केवळ 50 लोक सामील होणार आहेत. या लग्नात फक्त काही जवळचे नातेवाईक आणि घरातील सदस्य उपस्थित असतील. लग्नानंतर रिसेप्शन 2 डिसेंबरला मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आदित्य आणि श्वेताचा जो फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एकत्र दोघेही आनंदी दिसत आहेत. आदित्यने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे आणि श्वेताने पारंपरिक नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे. आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांनी पंतप्रधान मोदी आणि अमिताभ बच्चन यांना लग्नाला उपस्थित राहण्याचेही आमंत्रण दिले आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने मी तिच्यावर प्रेम करू लागलो, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.
View this post on Instagram
आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य (Aditya Narayan) म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत. आई-वडिलांनाही श्वेताबद्द्ल माहिती आहे. त्या दोघांनाही ती खूप आवडते. इतक्या छान जोडीदारामुळे मी देखील खूप खुश आहे.’ एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला ‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला. काही महिन्यांपूर्वी आमच्यात भांडण झाल्याने, आम्ही वेगळे झालो, अशा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा श्वेतासोबत बाहेर जाणेदेखील मुश्कील झाले होते, असे आदित्य म्हणाला. काही महिन्यांपूर्वी आदित्यचे नाव नेहा कक्करशी देखील जोडले गेले होते. मात्र, त्यांचे नाते केवळ शोमधील गमतीचा भाग होते. परंतु, या दोघांमध्ये छान मैत्रीचे नाते आहे.
संबंधित बातम्या :
Aditya Narayan | गायक आदित्य नारायण आर्थिक अडचणीत, पैशांसाठी ‘बाईक’ विकण्याची वेळ!
अनू मलिकनंतर आता आदित्य नारायणला इंडियन आयडल शोमधून काढले?
(Aditya naraya and shweta wedding ceremony)