Kapil Sharma Show : 125 दिवसांनी कपिल शर्मा शो ची शूटिंग सुरु
देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे गेले काही महिने सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग बंद (The Kapil Sharma Show) होती.
मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे गेले काही महिने सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग बंद (The Kapil Sharma Show) होती. आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर हळूहळू सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग सुरु करण्यात आली आहे. काही कार्यक्रमाचे नवीन एपिसोडही टेलिकास्ट केले आहेत. आता ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंगही सुरु होत आहे. कपिल शर्मा आणि भारती सिंहने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत, त्या व्हिडीओमध्ये भारती सिंह आणि सुमोना चक्रवर्ती सॅनिटायझर लावत असल्याचे दिसत (The Kapil Sharma Show) आहेत.
कपिल शर्मा शो ची शूटिंग सुरु
125 दिवसांनी ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंग सुरु होत आहे. सोशल मीडियावर जे व्हिडीओ शेअर झाले आहेत. त्यामध्ये सुमोना आणि भारती सॅनिटायझर लावत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण आता लवकरच चाहत्यांना कपिल शर्मा शो चा नवीन एपिसोड पाहता येणार आहे. चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा कार्यक्रम बंद झाला होता तेव्हा अनेक चाहते कपिलची आठवण काढत होते.
या लॉकडाऊनमध्ये कपिलने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. “हा लॉकडाऊनचा वेळ माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला मिळत आहे. तसेच मला माझी मुलगी अनायरासोबत खेळायलाही मिळत आहे”, असं कपिल शर्माने सांगितले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
भारती सिंहनेही लॉकडाऊनमध्ये आपल्या पतीसोबत वेळ घालवला. “मी यावेळीही गणपती पूजा करणार आहे. जसे होत आलेय तसेच होत राहणार. कारण माझ्या घरी नेहमी इको फ्रेण्डली गणपती येतो आणि घरीच त्यांचे विसर्जन केले जाते. यासाठी मला बाहेर जावे लागत नाही. पण यावेळी गणपीतच्या दर्शनासाठी येणे जाणे कमी होईल”, असं भारतीने नुकतेच एका चॅनलेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.
संबंधित बातम्या :
मालिका, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
Unlock 1 | मनोरंजन विश्व पुन्हा रुळावर; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगला सशर्त मान्यता