Joshimath Sinking: चारधाम यात्रा संकटात, काय भाविकांना यंदा बद्रीनाथचे दर्शन होणार?

जोशीमठमध्ये असलेल्या ४ हजार ५०० इमारतींपैकी सुमारे ५०० घरांमध्ये मोठ-मोठ्या भेगा निर्माण झाल्याय. अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केलीय.

Joshimath Sinking: चारधाम यात्रा संकटात, काय भाविकांना यंदा बद्रीनाथचे दर्शन होणार?
जोशीमठमध्ये भुस्खलन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 5:08 PM

जोशीमठ : उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath Sinking) भूस्खलन होत आहे. यामुळे बद्रीनाथ धामच्या (Badrinath Dham) मुख्य मार्गावरील अडचणी दिवसांदिवस वाढत आहे. यामुळे चारधाम यात्राच संकटात आली आहे. आता पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढाव घेतला. पंतप्रधान कार्यालय सातत्याने उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे.

जोशीमठमध्ये अचानक घबराहट निर्माण झाली आहे. जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडताय. भूस्खलन होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झालीय. स्थानिका नागरिक अजूनही २०१३ व २०२१ मधील घटना विसरल्या नाही. २०१३ मध्ये केदारमाथमध्ये महापूर आला होता. त्यावेळी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीत प्रचंड नुकसान झाले होते. ऋषिकेशमधील परमार्थ घाट पुर्ण नष्ट झाला होता. २०२१ मध्ये चमोलीत धोलीगंगा ग्लेशियर पडला होता. त्यावेळी प्रचंड नुकसान झाले होते.

PMO कडून चौकशी जोशीमठमधील भूस्खलन प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने बैठक घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती मागविली. जोशीमठमध्ये असलेल्या ४ हजार ५०० इमारतींपैकी सुमारे ५०० घरांमध्ये मोठ-मोठ्या भेगा निर्माण झाल्याय. अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केलीय. पंतप्रधान कार्यालय उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. या सर्व प्रकारमुळे यंदा चारधाम यात्रा होणार का? हा प्रश्न निर्माण झालाय. चारधाम यात्रा वसंत पंचमीपासून सुरु होते. यामुळे सरकारकडे आता कमी कालावधी उरलाय.

चार धाम किंवा छोटा चार धाम म्हणजे काय

छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्माच्या हिमालय पर्वतरांगांपैकी एक पवित्र मंदिर आहे. हे उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात वसलेले आहे आणि या मार्गावर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री असे चार धाम आहेत. यापैकी बद्रीनाथ धाम ही भारताच्या चार धामपैकी सर्वात उत्तरी आहे. या चारही ठिकाणांची स्वतःची खासियत असली तरी चारधामच्या रूपाने ते एक युनिट म्हणून पाहिले जातात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.