व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 11:22 PM

धुळे : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे जितेंद्र भोई यांना न्याय मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात जितेंद्र भोई यांचा उल्लेख केला. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ची टीम भटाणे गावात दाखल झाली. यावेळी जितेंद्र भोई यांनी आपला अनुभव ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत शेअर केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

“माझ्याकडे उन्हाळ्यात मक्याचं पीक आलं होतं. लॉकडाऊन काळात मला मका विकता आला नाही. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या एका व्यापाऱ्याला मी मका विकला. व्यापाऱ्याने मका घेतल्यानंतर आठ दिवसांनी आरटीजीएस करतो, असं सांगितलं. मात्र, आठ दिवसांनी त्याने आरटीजीएस केलं नाही. या व्यापाऱ्याचा मोबाईल स्वीच ऑफ यायचा. जेव्हा फोन लागायचा तेव्हा टाळाटाळ करायचा किंवा बरोबर उत्तर द्यायचा नाही”, असं जितेंद्र भोई यांनी सांगितलं.

“मी खूप प्रयत्न केले, मात्र, व्यापाऱ्याने अडीच-तीन महिने पैसे दिले नाहीत. दरम्यान, माझ्या एका मित्राने कृषी कायद्याची माहिती दिली. या कायद्याअंतर्गत मी व्यापाऱ्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने व्यापाऱ्याला नोटीस बजावली. अखेर व्यापाऱ्यानेही पैसे देऊ, असं आश्वासन दिलं”, असं जितेंद्र भोई म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात माझा उल्लेख केला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली तर इतर शेतकऱ्यांनाही कृषी कायद्याअंतर्गत न्याय मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या कायद्याचा अवलंब करावा”, असं आवाहन जितेंद्र भोई यांनी केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

हेही वाचा : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, धु्ळ्यात अवैध गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला बेड्या, 14 लाखांची पीकं जप्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.