AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा

नेवासा ‌तालुक्यातील फतेपुर गावातील सोमेश्वर लवांडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने थायलंडमध्ये विकसित केलेल्या फोर-जी सुपर नेपियर जातीच्या चाऱ्याची लागवड केली.

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा
Follow us
| Updated on: Aug 31, 2020 | 10:45 AM

शिर्डी : बारावीपर्यंत शिक्षण आणि एक एकर शेती असलेल्या सोमेश्वर लवांडे या शेतकऱ्याने चार वर्षाच्या कष्टानंतर चारा उद्योगात गगनभरारी घेतली. इतकंच नव्हे तर इतर शेतकऱ्यांनाही शाश्वत उत्पन्न मिळवून दिलं आहे. नेवासा तालुक्यातील फत्तेपुर गावातील सोमेश्वरने चार वर्ष केलेल्या प्रयोगाला अखेर यश मिळालं. थायलंडमध्ये विकसित ‘4G बुलेट सुपर नेपियर’ या चारा पिकाची‌ प्रथमच उत्पादकता घेत लॉकडाऊनच्या काळात त्याने लाखो रुपयांचा नफा कमावला. (Ahmednagar Nevasa Farmer Someshwar Lavande earns Lakhs during Lockdown from Thailand Origin Hay)

नेवासा ‌तालुक्यातील फतेपुर हे 1400 लोकसंख्या असणारं छोटंसं गाव. या गावातील सोमेश्वर लवांडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने थायलंडमध्ये विकसित केलेल्या फोर-जी सुपर नेपियर जातीच्या चाऱ्याची लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अनेक अडथळे, नुकसान सोसल्यानंतर लवांडे यांचा हा चारा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत लवांडे यांनी इतर शेतकऱ्यांना दिलासा दिला. लॉकडाऊनमध्ये 15 लाखांची उलाढाल चारा उद्योगातून झाली असून चार लाखांचा निव्वळ नफा केवळ 15 गुंठ्यात मिळवला.

सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्याने शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु केला. नवनवीन पिकांचा शोध घेताना याच वेळी त्याला थायलंडमधील विकसित 4G बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल, हे लक्षात घेत तीन वर्षांपासून केलेल्या प्रयोगानंतर यश मिळवले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना महागडा चारा विकत घेऊन दूध धंदा करावा लागतो. मात्र त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी शेतकऱ्यांची अवस्था होते. मका पिकावर लष्करी अळीचं संकट बघता चारा घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे फोर जी बुलेट सुपर नेपियर हे दूध धंद्यासाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी लवांडे यांच्याकडे बियाणे खरेदीसाठी संपर्क साधत आहेत.

हेही वाचा : झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

चारा शेतीला उद्योगाची जोड देत फोर-जी बुलेट सुपर नेपियर, दशरथ, जीबी नंबर वन यासह दहा जातीच्या घास बियाणांची उत्पादकता लवांडे यांनी केली आहे. अल्पभूधारक असल्याने आसपासच्या शेतकऱ्यांशी करार करत लवांडे यांनी इतर शेतकऱ्यांना देखील आर्थिक पाठबळ मिळून दिले आहे. गावातील अनेक शेतकरी या चारा उद्योगात उतरले आहेत. कमी पाणी, तात्काळ उत्पादन आणि शेतकऱ्यांची मागणी यामुळे गावात चारा उद्योग बहरला आहे.

एकीकडे पारंपरिक पिकांना भाव मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत असताना दुसरीकडे सोमेश्वर लवांडे याने शेतीत केलेला प्रयोग यशस्वी ठरत असून फत्तेपूर या छोट्याशा गावात महाराष्ट्रातून शेतकरी भेट देत आहेत. 4 G बियाणाला मागणी वाढत आहे. कष्ट, चिकाटीच्या जोरावर अपयश पचवत आज लवांडे यांना हे यश मिळवता आलं. (Ahmednagar Nevasa Farmer Someshwar Lavande earns Lakhs during Lockdown from Thailand Origin Hay)

चारा पिकाची वैशिष्ट्ये

सर्वात जास्त प्रथिने – 15 ते 18% प्रोटीनची मात्रा

मुरघास (सायलेज) स्पेशलिस्ट

एका वर्षाला 4 ते 5 कापण्या

5 ते 6 वर्षे चालणारी एकदम जलद वाढ

दुधारु जनावरांसाठी वरदान

खुराकावर खर्चाची बचत

18 ते 20 फुटापर्यंत उंची

(Ahmednagar Nevasa Farmer Someshwar Lavande earns Lakhs during Lockdown from Thailand Origin Hay)

अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.