मुंबई : अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona positive). अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.
बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan report corona positive).
महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबत रात्री उशिरा माहिती दिली.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
अभिषेक बच्चन यांचे ट्विट
“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली
Earlier today both my father and I tested positive for COVID 19. Both of us having mild symptoms have been admitted to hospital. We have informed all the required authorities and our family and staff are all being tested. I request all to stay calm and not panic. Thank you. ??
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) July 11, 2020
अमिताभ बच्चन यांचे ट्विट
“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी बच्चन यांच्या निवासस्थानी ‘जलसा’ बंगल्यावर दाखल झाले. ‘जलसा’ बंगला पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आला. याशिवाय अमिताभ यांचा ‘जलसा’ आणि ‘जानकी’ बंगला दररोज सॅनिटाईज केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बंगल्याच्याबाहेर मोठे फलक लावून पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. जलसामधील परिस्थिती चांगली असून सर्वांचं काऊंसिलिंग करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांनी दिली. तर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या (Anil Deshmukh on Amitabh Bachchan Corona). या सर्वांनी बच्चन कुटुंबियांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन हे कोरोनावर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील. “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा.”
महानायक अमिताभ बच्चन जी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, “शहेनशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 11, 2020
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्विट करत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनी त्यांना असलेल्या लक्षणांच्या आधारे कोरोना चाचणी केली. या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ते दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही सौम्य लक्षणं आहेत.”
महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते मुंबई येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. #AmitabhBachchan pic.twitter.com/CYS7U5NxmU
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 11, 2020
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. सोनम कपूर, क्रिती खरबंदा, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यासारख्या अनेक कलाकारांनी ट्विटवर रिट्विट केलं आहे.
त्यांच्या ट्विटरवर आतापर्यंत जवळपास 56 हजार रिट्विट करण्यात आले आहे. तसेच अनेक चाहते अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
LIVE: Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकची प्रकृती स्थिर, उपचार सुरु
Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना