Pandharpur Wari | आळंदी देवस्थान विश्वस्थांची बैठक, अजित पवारांसमोर तीन पर्याय
या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर वारीसाठी तीन पर्याय ठेवले आहेत
पुणे : यंदाच्या पंढरपूर आषाढी एकादशी वारी सोहळ्यावर (Ajit Pawar And Alandi Administration) ‘कोरोना’चं सावट आहे. पालखी सोहळ्याबाबतही अद्याप कुठला निर्णय झालेला नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीबाबत आळंदी देवस्थान विश्वस्थांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर आज बैठक झाली. या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर वारी करण्यासाठी तीन पर्याय (Ajit Pawar And Alandi Administration) ठेवले आहेत.
वारकरी विश्वस्थांचे तीन पर्याय कोणते?
- 300 वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्या
- 200 मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी
- वाहनात पालखी घालून 40 वारकरी पंढरपुरला जातील
हे तीन पर्याय वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर ठेवले आहेत.
आषाढी वारी वीस वारकऱ्यांसोबत करा, आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय
यंदाची आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांच्या सोबत करा, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचवला होता. पालखी सोहळा वद्य अष्टमी म्हणजेच 13 जून रोजी करु नका, त्याऐवजी थेट आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 30 जून रोजी मोजक्या वीस वारकऱ्यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांकडून सुचवण्यात आला होता. आळंदीच्या रहिवाशांनी सह्यांचे निवेदन पंढरपूर देवस्थानला देण्यात आले होते. सोहळा वाटेत कोठेही न थांबता थेट पंढपूरला न्या, अशी सूचनाही (Ajit Pawar And Alandi Administration)करण्यात आली.
आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांसोबत करा, ‘कोरोना’च्या सावटामुळे आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय https://t.co/G58QalNrMJ #AashadhiEkadashi #Pandharpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2020
पंढरपूर आषाढी वारी
महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनीही घरुनच पंढरीच्या विठुरायाला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय (Ajit Pawar And Alandi Administration) घेतला आहे.
संबंधित बातम्या :
आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांसोबत करा, आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय
देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार