हा तर संपूर्ण मराठी अस्मितेवर हल्ला; दीपक दळवींवरील भ्याड हल्ल्याचा अजित पवारांकडून तीव्र निषेध

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित यांनी या घटनेचा निषेध केला.

हा तर संपूर्ण मराठी अस्मितेवर हल्ला; दीपक दळवींवरील भ्याड हल्ल्याचा अजित पवारांकडून तीव्र निषेध
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 11:58 PM

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित यांनी या घटनेचा निषेध केला. (Ajit Pawar strongly condemns the attack on Deepak Dalvi in Belgaum)

अजित पवार म्हणाले की, या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषिक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठीभाषक एकदिलाने एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठीभाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला, अजित पवार म्हणाले की, “सीमाागातील मराठीभाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठीभाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीने करण्यात आले असावे. मात्र, अशा घटनांमुळे मराठीभाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे, त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.”

का केले कृत्य?

कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाप्रश्न पेटला आहे.

व्हिडीओ पाहा

हजारो लोक येणार

बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये आज सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. यंदा या अधिवेशनाच्या खर्चाची मर्यादा मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी निम्म्यावर आणलीय. मात्र, तरीही 12 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अधिवेशनाला येणाऱ्या हजारो जणांची बेळगावातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी 2800 पोलीस कॉन्स्टेबल आणि 500 हून अधिक पोलीस अधिकारी आले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वगळता 4500 पेक्षा जास्त लोकांसाठी तब्बल 2100 खोल्या बुक केल्या आहेत.

इतर बातम्या

मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रसेसोबत युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘या’ दोन पक्षांसोबत केली आघाडी

1 लाख जण अंगावर आले तर काय कराल? राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, ठाकरे सरकारला कडक सवाल

Obc आरक्षणाच्या याचिकेवर होणारी सुनावणी उद्यावर, इतर राज्यांची परिस्थिती आपल्यासारखीच-भुजबळ

(Ajit Pawar strongly condemns the attack on Deepak Dalvi in Belgaum)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.