मुख्यमंत्र्यांकडून एकाच दगडात दोन लक्ष्यभेद, काँग्रेस-राष्ट्रवादीची मर्जीही राखली, मेहतांची विशेष पदी नेमणूक

मुख्यमंत्र्यांनी अजोय मेहतांना विशेष जबाबदारी दिली आहे (Ajoy Mehta has been appointed as the Principal Advisor to the CM Uddhav Thackeray).

मुख्यमंत्र्यांकडून एकाच दगडात दोन लक्ष्यभेद, काँग्रेस-राष्ट्रवादीची मर्जीही राखली, मेहतांची विशेष पदी नेमणूक
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 10:30 PM

मुंबई :  राज्याचे विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या जागी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नाही. महाविकास आघाडीमध्ये अजोय मेहता यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीची नाराजी होती. त्यामुळे त्यांची मुदतवाढ टाळून, मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं चित्र आहे. कारण अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नसली तरी, त्यांची नियुक्ती थेट मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून केली आहे (Ajoy Mehta has been appointed as the Principal Advisor to the CM Uddhav Thackeray).

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत. काँग्रेसचे तीन तर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली खदखद व्यक्त करत मेहतांची उचलबांगडी करण्याची मागणी केली होती. अखेर त्यांची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करत संजय कुमार यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अजोय मेहतांना विशेष जबाबदारी दिली आहे (Ajoy Mehta has been appointed as the Principal Advisor to the CM Uddhav Thackeray).

ठाकरे सरकारमध्ये मेहता यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव असलेले अजोय मेहता हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. पण, अजोय मेहता आता मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील.

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नसली, तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास पद दिलं आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलं.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरु करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

1984 च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असं सीएमओने म्हटलं आहे.

मंत्री अजोय मेहतांवर नाराज का?

अजोय मेहता यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षातील मंत्र्यांनी केली होती. काँग्रेसचे 3 मंत्री तर राष्ट्रवादीचे 4 मंत्र्यांच्या खात्याच्या कामकाजातील काही अधिकार काढण्याचा प्रस्ताव अजोय मेहतांनी तयार केला होता. हा प्रस्ताव त्यांनी मंत्री आणि सरकारला विश्वासात न घेता तयार केल्यामुळे काही मंत्री मेहतांवर नाराज होते. त्यामुळे मंत्र्यांकडून वारंवार त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली जात होती.

कोण आहेत अजोय मेहता?

अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असं सीएमओने म्हटलं आहे.

(Ajoy Mehta Will Replace Chief Secretary Sanjay Kumar)

संबंधित बातमी : अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.