Akbaruddin Owaisi ‘इम्तियाज जलीलने मुलाचं नाव औरंगजेब ठेवलंय का?’ औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्यांवर चंद्रकांत खैरेंची टीका
बाहेरील लोकांना या ठिकाणी आणून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आम्हीही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ असा पवित्रा आता चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. तसेच इम्तियाज जलील यांनी मुलांचं नाव औरंगजेब ठेवलं आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

औरंगाबाद : एमआयएमचे (MIM) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आजद औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरून औरंगाबादेतील शिवसेना नेते आता आक्रमक झाले आहेत. कारण औरंगाबादेत पोहचताच ओवैसी यांनी औरंगाबदेतल्या दर्ग्यांना भेट द्यायला सुरूवात केली तसेच ते औरंगजेबाच्याही (Aurangjeb) कबरीवर पोहोचले . तिथे त्यांनी फुलं वाहिली. आणि कबरीवर डोकं टेकवलं. मात्र आता यावरून शिवेसना नेते चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. इम्तियाज जलील हे चुकीने निवडूण आले आहेत. त्यामुळे ते बाहेरील लोकांना या ठिकाणी आणून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आम्हीही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ असा पवित्रा आता चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. तसेच इम्तियाज जलील यांनी मुलांचं नाव औरंगजेब ठेवलं आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
मुलाचं नाव औरंगजेब ठेवलं का?
या दौऱ्यावर टीका करताना खैरे म्हणाले, हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. कोणी येत आणि वातावरण खराब करत आहेत. आपण चांगल्या कामांचं अभिनंदन करु मात्र हाय लाईट होण्यासाठी तो माणून असं काही करत असतो. एमआयएमची कृती ही औरंगजेबासारखी आहे. मुस्लीम माणूस सुद्धा कबरीवर जात नाहीत. आमच्या इकडे राम- संभाजी- दत्ता- शिवाजी अशी मुलांची नावे ठेवली जातात. एकाही घरात औरंगजेबाचं नाव नाही आहे, जलील यांनी त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवले आहे का? असा सवाल करत खैरे यांनी हल्लाबोल चढवला आहे.
शिवसेना उत्तर देणार
तसेच याला शिवसेना उत्तर देणार आहे. आम्ही जनतेला दाखवून देणार आहे यांचं राजकारण, कबरीवर जायची गरज काय? हा तिकडे मुद्दाम वातावरण खराब करण्यासाठी गेला. ते मुद्दाम हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी तिकडे गेले. तर आता आम्ही काय सोडणार आहे का? असा इशाराही त्यांनी दिला. तसेच इकडे येउन कोणी तेड निर्माण करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. हा इकडचा खासदार चुकून निवडूण आला आहे. अस काही करायचं आणि वातावरण खराब करायचं अस त्यांच चालू आहे, मुस्लिम लोक कोणीही त्या कबरीवर जात नाहीत. त्या कबरीवर जायचा उद्देश मला समजला नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले. त्यामुळे औरंगाबादेतल्याला राजकाणाला पुन्हा धार्मिक रंग आला आहे.



