स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर सोमवारी पहाटे पाच वाजेपासून उघडणार

'अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय' असा जयघोष करत उद्या पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे (Akkalkot Swami Samarth temple reopen for devotee).

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर सोमवारी पहाटे पाच वाजेपासून उघडणार
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 5:38 PM

सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली मंदिरे उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर उद्यापासून (सोमवार, 16 नोव्हेंबर) मंदिरे उघडण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर उद्या भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ‘अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ असा जयघोष करत उद्या पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे (Akkalkot Swami Samarth temple reopen for devotee).

अक्कलकोट शहरात स्वामी दर्शनासाठी दररोज पाच हजाराहून अधिक भाविक येतात. मात्र कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मंदिरं बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अक्कलकोटचं स्वामी समर्थांचे मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं (Akkalkot Swami Samarth temple reopen for devotee).

मात्र आता राज्य सरकारच्या आदेशानुसारच स्वामी समर्थ मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता मंदिर खुले करण्यात येणार असून नित्य पूजेनंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाने मंदिरावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे मोठे हाल होते. मंदिर बंद असल्यामुळे दुकाने बंद होती. मात्र आता उद्यापासून मंदिरे उघडण्यात येणार असल्यामुळे त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रवेश नाही

राज्य सरकारने दिवाळी पाडवा अर्थात सोमवारपासून मंदिर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असं असलं तरी मंदिर संस्थांनांना सरकारकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाच्या आतील लहान मुलं आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसंच मास्क घातल्याशिवाय कुणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जायचंय, मग ‘हे’ नियम वाचा

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर खुलं करण्यापूर्वी सॅनिटाईज, तीन टप्प्यात मंदिर उघडणार

दररोज 4 हजार भाविकांना मिळणार तुळजाभवानीचे दर्शन, ऑनलाईन पाससह ऑफलाईन पास व्यवस्था, 16 तास मंदिर खुले राहणार

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.