दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्यात वार, नातेवाईकाचा जागीच मृत्यू
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून याचा राग मनात धरुन लाकडाच्या दांडक्याने डोक्यात वार करुन नातेवाईकाची हत्या (Palghar murder due to alcohol) केली.

पलाघर : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून याचा राग मनात धरुन लाकडाने डोक्यात वार करुन नातेवाईकाची हत्या (Palghar murder due to alcohol) केली. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घडली. या घनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जगणदेव राजभर असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रामविलास राजभर असं आरोपीचे नाव (Palghar murder due to alcohol) आहे. लॉकडाऊन दरम्यान राज्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जगणदेव बोईसरमध्ये चहाची टपरी चालवत होता. जगणदेवकडे त्याचा नातेवाईक रामविालसने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. जगणदेवने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रामविलासने मनात राग धरुन लाकडी दांडूक्याने जगणदेवच्या डोक्यात वार केला. त्यामुळे जगणदेवचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी बोईसल पोलिासांनी आरोपी रामविलासला ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या
औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत