अमेरिकेत ‘हेट क्राईम’मध्ये वाढ; दशकातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
एफबीआयच्या वार्षिक रिपोर्टच्या आकड्यांनुसार, कायदा अंमलबजावणी संस्थांनी अमेरिकेत 2019 मध्ये एकूण 7,314 हेट क्राईम्सच्या घटना नोंदवल्या गेल्या.
वॉशिंग्टन : अमेरिकेत ‘हेट क्राईम (America Hate Crime)’च्या प्रकरणांमध्य दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) सोमवारी 2019 मध्ये अमेरिकेत झालेल्या ‘हेट क्राईम’चे आकडे जारी केले आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत वैयक्तिक द्वेषाच्या गुन्ह्यांचा आकडा दशकातील सर्वाधिक असल्याचं एफबीआयने म्हटलं आहे (America Hate Crime).
एफबीआयच्या वार्षिक रिपोर्टच्या आकड्यांनुसार, कायदा अंमलबजावणी संस्थांनी (Law Enforcement Agencies) अमेरिकेत 2019 मध्ये एकूण 7,314 हेट क्राईम्सच्या घटना नोंदवल्या गेल्या. हा आकडा दशकातील सर्वाधिक आहे.
2008 नंतरचा सर्वाधिक आकडा
कायदा अंमलबजावणी संस्थांनी वर्ष 2019 मध्ये जात, वांशिकता, धर्म, लैंगिक अत्याचार, अपंगत्व आणि लिंग प्रेरित गुन्ह्याच्या 7,314 घटना आणि 8,559 संबंधित गुन्ह्यांचा अहवाल सादर केला, असं एफबीआयच्या वार्षिक अहवालात सांगितलं. 2008 नंतर अमेरिकेतील हेट क्राईमचा हा सर्वाधिक आकडा आहे. 2017 मध्ये एफबीआयने हेट क्राईम्सच्या 7,175 आणि 2018 मध्ये हेट क्राईम्सच्या 7,120 घटनांची नोंद केली होती (America Hate Crime).
52.5 टक्के श्वेत गुन्हेगार
गेल्या वर्षी झालेल्या गुन्हेगारी घटनांना तीन भागांमध्ये विभाजित केलं गेलं. त्यात 5512 गुन्ह्यांना ‘लोकांविरोधात गुन्हे’, 2811 गुन्ह्यांना ‘संपत्ती विरोधातील गुन्हे’ आणि 236 गुन्ह्यांना ‘समाजाविरोधातील गुन्हे’ अशी विभागणी केली गेली. यात 4.4 टक्के हेट क्राईम्सच्या घटना चर्चा, सभा, मशिदी आणि इतर पूजा स्थळांवर झालेल्या आहेत. या घटनांसाठी जबाबदार 6406 आरोपींपैकी 52.2 टक्के आरोपी हे श्वेतवर्णीय होते तर 23.9 टक्के आरोपी हे आफ्रिकी अमेरिकन होते.
हेट क्राईम म्हणजे काय?
जात, धर्म, लिंग इत्यादीच्या आधारे होणारे हिंसात्मक गुन्हे हे हेट क्राईम कॅटेगरीमध्ये येतात. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराने एखाद्या विशिष्ट सामाजिक क्षेत्राचे किंवा जातीचे सदस्य असलेल्या पीडिताला लक्ष्य केले असेल, तर अशा घटनांना ‘हेट क्राईम’ किंवा ‘द्वेषपूर्ण हल्ला’ असे म्हणतात. यामध्ये शारिरीक हल्ला, संपत्तीचं नुकसान, धमकावणे, शोषण करणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे या घटनांचा समावेश असतो.
US Election | ट्रम्प समर्थक मतमोजणीच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर, वॉशिंग्टनमध्ये बायडन- ट्रम्प समर्थकांमध्ये बाचाबाची#USElections2020 #USAelection2020 #USElections #DonaldTrump #JoeBidenKamalaHarris2020 https://t.co/na1CqYfQ4N
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2020
America Hate Crime
संबंधित बातम्या :
रशिया आणि उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हल्ला, भारतातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लक्ष्य