खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील 20 दिवस क्वारंटाईन राहणार

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे (Amravati MP Navneet Kaur Rana get discharged from lilavati hospital).

खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील 20 दिवस क्वारंटाईन राहणार
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 3:31 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुढील 20 दिवस त्या क्वारंटाईन राहणार आहेत. नवनीत राणा यांना रविवारी (16 ऑगस्ट) रात्री डिस्चार्ज मिळाला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला (Amravati MP Navneet Kaur Rana get discharged from lilavati hospital).

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट 6 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासह कुटुंबातील एकूण 12 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये नवनीत राणा यांचे दोन लहान मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे (Amravati MP Navneet Kaur Rana get discharged from lilavati hospital).

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर सुरुवातीला नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आणि त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्यामुळे वोकहार्ट रुग्णालयाच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुंबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनीत राणा यांना रस्तेमार्गे रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं गेलं. यावेळी त्यांचे पती रवी राणादेखील रुग्णवाहिकेत होते.

नवनीत राणा यांच्यावर लीलवाती रुग्णालयात डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. दरम्यान, नवनीत राणा यांनी दोन दिवसांपूर्वी आयसीयूतून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी आपल्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या सर्व हितचिंतकांना प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामं करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली होती.

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

संबंधित बातम्या :

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला, लीलावतीत उपचार होणार

प्रकृती स्थिर, ICU बाहेर आले, नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.