शिवाजी महाराज यांनी घडवला असा एक स्वतंत्र राजा, ज्याने मुघलांविरोधात 52 लढाया जिंकल्या
डोळे उघडताच बलाढ्य शत्रूंनी त्याची पारंपारिक संपत्ती हिसकावून घेतली. जवळच्या नातेवाईकांच्या विश्वासघातामुळे ज्याने आई वडील गमावले. लष्करी सामर्थ्य किंवा आर्थिक सामर्थ्य उरले नव्हते. पण, त्याच्याजवळ होते शौर्य, थोर घराण्याची मुल्ये, शूर माता पिताचे धैर्य, माता विंध्यवासिनीचे आशीर्वाद, तो तुटला नाही, बुडला नाही, आत्महत्या केली नाही तर त्याला मार्ग सापडला तो शिवाजी महाराज यांच्या रूपाने...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक निस्सीम भक्त होता. पहिल्याच भेटीत त्याने शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानले. यमुनेपासून नर्मदेपर्यंत आणि चंबळपासून टोंसपर्यंत त्या शिष्याची तलवार अशी तळपली की त्याच्या तेजापुढे बलाढ्य मुघल फिके पडले. मुघलांविरोधात त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 52 लढाया जिंकल्या. त्यामागे प्रेरणा होती ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या मनात चेतवलेल्या स्वराज्याच्या स्फुलिंगाची. त्यावेळी त्याच्याजवळ अवघे पाच घोडदळ आणि 25 तलवारबाज इतकेच सैन्य होते. पण, त्याने त्याच सैन्याच्या बळावर मुघलांशी संघर्ष सुरु केला. त्याच्या पराक्रमाची चर्चा होऊ लागली सैन्य वाढू लागले. स्वतःचे राज्य उभे राहिले आणि तब्बल 80 वर्ष त्यांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिष्य, बाजीराव पेशवे यांचे सासरे आणि बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांनी हिंदुस्थानाला कलाटणी देणारा इतिहास घडवला. ...