सुट्टीच्या दिवशी ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 लोकांचा जागीच मृत्यू तर 4 जखमी

भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे बस थेट पलटी झाली. त्यामुळे बसमधल्या 13 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सुट्टीच्या दिवशी ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 लोकांचा जागीच मृत्यू तर 4 जखमी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 9:35 AM

मदारपूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशमध्ये रविवारी सकाळी एक भीषण अपघात (Road Accident in Andhra Pradesh) झाल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक यांच्यात धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. आंध्र प्रदेशातील हा रस्ता अपघात कुर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावात झाला आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (andhra pradesh road accident in 13 people killed in truck and bus accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये जखमी झालेल्यां सध्या नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर यामध्ये तब्बल 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे बस थेट पलटी झाली. त्यामुळे बसमधल्या 13 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी 13 मृतदेह ताब्यात घेत त्यांना शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर मृतांची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गंभीर बाब म्हणजे आंध्र प्रदेशात शनिवारीही एक भीषण रस्ते अपघात झाला होता. यामध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील 20 जणांना घेऊन निघालेली बस अराकुजवळील अनंतगिरी इथं खड्ड्यात पडली. यामध्ये चार जण ठार तर 13 जण जखमी झाले होते. पीएम मोदी यांनीही याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. (andhra pradesh road accident in 13 people killed in truck and bus accident)

संबंधित बातम्या – 

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

“पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं दुःख, पण बंजारा समाजाची बदनामी थांबवा”

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला

(andhra pradesh road accident in 13 people killed in truck and bus accident)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.