Rohit Pawar | रोहित पवार यांना अटक होईल का ?; अनिल देशमुख थेट म्हणाले, ते ..

राष्ट्रवादीचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी चौकशीसाठी रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावलं होतं. त्यासाठी ते आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं.

Rohit Pawar | रोहित पवार यांना अटक होईल का ?; अनिल देशमुख थेट म्हणाले, ते ..
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 1:58 PM

मुंबई | 24 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी चौकशीसाठी रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावलं होतं. त्यासाठी ते आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आजोबा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. आज सकाळपासून राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते रोहित यांच्या समर्थनासाठी जमले होते. त्यांनी रोहित यांच्या नावाच्या घोषणा दिल्या तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत बॅनरही फडकावले. एकंदरच राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत रोहित पवार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभं असल्याचं दाखवून दिलं.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय तपास यंत्राणांकडून ठरवून विरोधकांना त्रास दिला जात आहे, विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जातंय अशी टीका त्यांनी यावेळी केली. मात्र राष्ट्रवादी पक्ष रोहीत पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवारांना अटक होईल का ?

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांना अटक होईल का ? यावरही अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

चार वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रयत्न केला होता, तेव्हा शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की मी स्वत: ईडी कार्यालयात जाईन, तेव्हा तेव्हा लाखो लोकं रस्त्यावर आले होते. मुंबई शहर बंद होण्याची वेळ आली होती, तेव्हा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी स्वत: शरद पवार यांची भेट घेतली. जो कुणी चांगलं काम करतो, सरकारच्या विरोधी भूमिका घेतो त्यांच्या विरोधात चौकशीची कारवाई करण्यात येते. रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा चांगली काढली, त्यामुळे त्यांना त्रास दिला जातोय. असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलीक यांना दिला गेला, अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई नाही. फक्त विरोधकांना टार्गेट केलं जातं आहे. ईडीकडे मोठी ताकद आहे, एकदा अटक झाली तर वर्षभर बेल होत नाही. रोहित पवारांना अटक होईल का ? त्यांना विचारण्यात आल्यावर, आता अटक होईल का, हे ईडीच्या अधिकाऱ्यांनाच विचारा असे देशमुख म्हणाले. निवडणूक जवळ येतील तशा कारवाया वाढणार, कितीही त्रास दिला तरी आम्ही खंबीर आहोत, असेही त्यांनी बजावून सांगितलं.

राष्ट्रवादी पक्ष रोहित पवारांच्या पाठिशी

विरोधकांना केंद्रीय तपास यंत्राणांकडून ठरवून त्रास दिला जातोय. दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल येथील सरकारला ईडी कडून त्रास दिला जात आहे. पण राष्ट्रवादी पक्ष रोहित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. रोहित पवार आमचा तरुण सहकारी आहे त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत. त्यांनी संघर्ष यात्रा काढली , शेतकऱ्यांचे, युवकांचे प्रश्न सरकारसमोर सभागृहात मांडले. जे चांगलं काम करतात, त्यांच्याविरोधात अशीच कारवाई केली जाते. निवडणूक जवळ येईल तशा कारवायाही वाढतील, पण कितीही त्रास झाला तरी आम्ही मागे हटणार नाही, खंबीर राहू असा पुनरुच्चार त्यांनी केला.

काय आहे प्रकरण ?

कन्नड सहकारी कारखाना अवसायनात निघाला. शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती ॲग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती ॲग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपये जमा केले ते, बारामती ॲग्रोने दिल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.