Omicron| नाशिकमध्ये अजून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, 446 जणांवर उपचार सुरू, 341 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 056 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Omicron| नाशिकमध्ये अजून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, 446 जणांवर उपचार सुरू, 341 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:41 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरात आज 42 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात सद्यस्थितीत 446 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 341 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने नाशिककरांची आणि प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे.

असे आहेत रुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 056 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 446 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 746 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 37, बागलाण 16, चांदवड 9, देवळा 13, दिंडोरी 13, इगतपुरी 28, कळवण 9, मालेगाव 7, नांदगाव 12, निफाड 53, पेठ 2, सिन्नर 32, सुरगाणा 5, त्र्यंबकेश्वर 3, येवला 4 अशा एकूण 243 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 188, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 6 तर जिल्ह्याबाहेरील 9 रुग्ण असून, एकूण 446 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 248 रुग्ण आढळून आले आहेत.

नवीन नियम लागू

नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल. हे नवे नियम 23 तारखेपासून अंमलात येतील, अशी माहिती गुरुवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.

मास्क वापरण्याचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.

इतर बातम्याः

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त

Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.