T20 World Cup FAQ : एकूण संघ आणि सामने किती, विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस? जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमान या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने (ICC) नुकतेच जाहीर केले आहेत.

T20 World Cup FAQ : एकूण संघ आणि सामने किती, विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस? जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
CC-T20-World-Cup
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 1:59 PM

मुंबई : भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमान या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने (ICC) नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या जागेबाबतही सर्वकाही स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत आता सर्वांनाच पाहता येणार आहे. (Answers to All FAQ related to ICC T20 World Cup 2021 in UAE)

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-1 मध्ये आहेत. या संघामध्ये सामने कधी आणि कसे होणार याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) शुक्रवारी (16 जुलै) टी-20 विश्व चषकात होणाऱ्या सामन्यांबाबत मोठी माहिती दिली. या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.

या ठिकाणी रंगणार सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.ॉ

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला भारत विरुद्ध पाकिस्तान या 24 ऑक्टोबर रोजीच्या सामन्याने सुरुवात होईल. भारताचे ग्रुप स्टेजमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

सामन्यानंतर खालीलप्रमाणे पॉईंट्स दिले जातील

विजयी संघाला – 2 गुण बरोबरी, अनिर्णित किंवा रद्द झाल्यास – दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण पराभूत संघाला – 0 गुण

विजेत्यांची होणार चांदी

या भव्य स्पर्धेत विजयी रक्कमही तितकीच भव्य आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार विश्वचषक विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12.2 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 6.1 कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी भारतीय रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर (भारतीय चलणानुसार 42 कोटी) इतकी बक्षिसी रक्कम सहभागी संघांमध्ये वाटप केली जाणार आहे.

आतापर्यंतचे विजेते

टी20 विश्वचषक या स्पर्धेला 2007 साली सुरुवात झाली. त्यावर्षी पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्त्वाखाली विजय मिळवत भारताने या विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2009 साली पाकिस्तानने, 2010 साली इंग्लंडने तर 2012 साली वेस्ट इंडिजने जेतेपत मिळवलं. ज्यानंतर 2014 मध्ये श्रीलंकने ट्रॉफी जिंकत 2016 मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजने विजय मिळवत दोन वेळा ही ट्रॉफी पटकावण्याचा मान मिळवला.

पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी भारताचा सामना ‘या’ दोन संघाशी

आयसीसी टी20 विश्व चषकाला (ICC T20 World Cup 2021) काही दिवसातच सुरुवात होत आहे. पात्रता फेरीचे सामने होताच सुपर 12 संघामध्ये लढती सुरु होऊन खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होईल. टीम इंडिया (Team India) देखील सुपर-12 स्टेजमधून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी सराव म्हणून भारतीय संघ दोन संघाशी भिडणार आहे.

हे दोन संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड सोबतचा सामना रद्द होऊन दक्षिण आफ्रिकेसोबत खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता आयसीसीने नव्याने पोस्ट केलेल्या वेळापत्रकात भारताचे सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघसोबतच असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही संघासोबत सराव सामने खेळून स्पर्धेपूर्वी भारत तयार होणार आहे. (Answers to All FAQ related to ICC T20 World Cup 2021 in UAE)

विश्वचषकात सहभागी होणारे संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

इंग्लंड (England): इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, जॉस बटलर, सैम करन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, टेमाल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेविड विली, क्रिस वोक्स और मार्क वुड | राखीव: टॉम करन, जेम्स विंस आणि लियाम डॉसन.

बांग्लादेश (Bangladesh): महमुदुल्लाह (कर्णधार), मोहम्मद नईम, लिटन दास (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सौम्य सरकार, मुश्फ़िकुर रहीम, अफ़ीफ़ हुसैन, नुरुल हसन, महेदी हसन, नासूम अहमद, मुस्ताफ़िज़ुर रहमान, शोरीफ़ुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफ़ुद्दीन, शमीम हुसैन. राखीव: रुबेल हुसैन, अमीनुल इस्लाम बिप्लब

अफगानिस्तान (Afghanistan) : राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजाई (यष्टीरक्षक), उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हमीद हसन, शरफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शफूर जादरान आणि कैस अहमद.

न्यूझीलंड (New Zealand): केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉनवे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जॅमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमैन आणि टॉड एस्टल.

पाकिस्तान (Pakistan): बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हैरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिज़वान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन शाह अफरीदी | राखीव- फखर जमां, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

ऑस्ट्रेलिया (Australia): एरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मैक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल मार्श, ऐश्टन ऐगर, पॅट कमिन्स, जॉश हेजलवुड, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा.

दक्षिण अफ्रीका (South Africa): टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बजोर्न फॉर्टयूइन,रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडिन मार्कराम, डेविड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी नगिदी, एनरिख नॉर्खिया, ड्वायन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसैन | राखीव: जॉर्जी लिंडे, एंडिले फेहुलक्वायो, लिजाड विलियम्स.

इतर बातम्या

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला खास संदेश, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू काय म्हणाला?

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’

(Answers to All FAQ related to ICC T20 World Cup 2021 in UAE)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.