गरोदर असल्याचं वृत्त, अनुष्का शर्मा म्हणते….

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या अगोदरच अनुष्का शर्मा गरोदर असल्याचं वृत्त आहे. यामुळेच अनुष्काने झिरो सिनेमानंतर इतर कोणताही सिनेमा हातात घेतला नसल्याचंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. पण या सर्व बातम्या निरर्थक असल्याचं अनुष्काने म्हटलं आहे. गरोदर असल्याचं […]

गरोदर असल्याचं वृत्त, अनुष्का शर्मा म्हणते....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या अगोदरच अनुष्का शर्मा गरोदर असल्याचं वृत्त आहे. यामुळेच अनुष्काने झिरो सिनेमानंतर इतर कोणताही सिनेमा हातात घेतला नसल्याचंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. पण या सर्व बातम्या निरर्थक असल्याचं अनुष्काने म्हटलं आहे.

गरोदर असल्याचं वृत्त ही अफवा असल्याचं अनुष्काने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. लोक अशा गोष्टी करतच असतात. पण हे पूर्णपणे निरर्थक आणि मूर्खपणा आहे. कारण, अशा गोष्टी तुम्ही लपवू नाही शकत. प्रत्येक अभिनेत्रीला या परिस्थितीतून जावं लागतं. लोक लग्नाच्या अगोदरच तुम्हाला कुणाची तरी पत्नी बनवून टाकतात आणि गरोदर होण्याच्या अगोदरच आई बनवतात, असं म्हणते अनुष्काने हे वृत्त फेटाळलं.

या गोष्टींना महत्त्व देत नसल्याचंही अनुष्काने स्पष्ट केलंय. अशा गोष्टी जेव्हा वाचायला मिळातात, तेव्हा हे सर्व येतं कुठून असा प्रश्न पडत असल्याचं ती म्हणाली. सध्या फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलेलं असून कामातच व्यस्त असल्याचं अनुष्काने सांगितलं.

सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या अनुष्काच्या प्रेग्नंसीविषयी अनेक बातम्या आल्या होत्या. अखेर तिने यावर स्पष्टीकरण दिलं. अनुष्का शर्मा झिरो या सिनेमात दिसणार आहे, जो 21 डिसेंबरला रिलीज होईल. शाहरुख खान, कतरिना कैफ देखील या सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

गेल्या वर्षी 11 डिसेंबरला इटलीत अनुष्का आणि विराटचा लग्न सोहळा पार पडला होता. अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याविषयी मोजक्या लोकांनाच माहिती होती. भारतात आल्यानंतर मुंबई आणि दिल्लीत विरानुष्काने ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.