उत्तरप्रदेश – भाजपने (bjp) आज युपीत राजकीय वातावरण जोरात तापवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण त्यांनी आज चक्क मुलायम सिंह यादव यांना घरात विरोध निर्माण केल्याने राजकारण कुठल्या धराला पोहचले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंग धरू लागली आहे. अपर्णा यादव (aprna yadav) या मुलायम सिंह यांच्या सुन असून त्यांना उमेदवारी जाहीर होताचं त्यांनी अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्यावरती जोरादार टिका केली आहे.
काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतर अपर्णा यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. याच्या आगोदर अर्पणा यांनी भाजपच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्याची सुध्दा चर्चा आहे. राम मंदीराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी तिथं मोठी देणगी सुध्दा दिली होती. त्यावेळी त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
युपीत भाजपला लागलेली गळती काही दिवसांपासून थांबत नव्हती. भाजपच्या अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी समाजवादी पार्टी जॉईन केली. त्यामुळे अनेकांना असं वाटतं होतं समाजवादी पक्षाचं पारडं जड आहे. परंतु भाजपने आता समाजवादी पक्षाला धक्के द्यायला सुरू केल्याची सुध्दा चर्चा आहे.
अपर्णा यादव यांचा परिचय
त्याचं पुर्ण नाव अपर्णा बिष्ट यादव, त्या युपीतील सामाजिक आणि राजकीय नेत्या म्हणून प्रसिध्द आहेत. त्याच्यानंतर मुलायम सिंह यांच्या सुनबाई आहेत. 2011 मध्ये मुलायम सिंह यांच्या मुलाने अपर्णा यांच्यासोबत लग्न केलं. लखनऊ मधून 2017 ला त्यांना समाजवादी पार्टीकडून निवडणुक लढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंत महिलांच्या कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.
नाव – अपर्णा बिष्ट यादव
पक्ष – भाजप
शिक्षण- पदव्युत्तर
व्यवसाय- सामाजिक कार्यकर्ता
वडिलांचे नाव- अरविंद सिंह
बिश्त पतीचे नाव- प्रतीक यादव
अपर्णा यांनी मँचेस्टर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच भातखंडे संगीत विद्यालयात नऊ वर्षे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले. ठुमरी कलेत त्या पारंगत आहेत. 2014 मध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे कौतुक केल्यावर ती प्रकाशझोतात आली होती.