रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल चमक
गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने त्याचे अनेक फायदे होतात. गुलाब पाण्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण मिळते. तसेच गुलाब पाण्यामुळे चेहरा चमकदार होतो आणि टॅनिंगची समस्या देखील कमी होते.
ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये गुलाब पाण्याचा वापर फार वर्षापासून होत आहे. असे मानले जाते की त्यात हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुलाब पाणी चेहऱ्यावर कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. याशिवाय ज्यांना पिगमेंटेशनची समस्या आहे त्यांच्यासाठी ही गुलाब पाणी फायदेशीर आहे. त्यासोबतच चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याचे अनेक फायदे आहेत.
गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो.
कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर
कोरड्या त्वचेची समस्या असलेल्या लोकांसाठी गुलाब पाणी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेला आतून मॉइश्चरायझर करताना ते ओलावा लॉक करते. याशिवाय कोरडेपणामुळे खाज सुटते आणि ह्याचा त्रास होतो तर गुलाब पाणी लावल्यामुळे खाज येणे बंद होते.
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उत्तम क्लिन्झर
तेलकट त्वचेसाठी हे सर्वोत्तम क्लिन्झर आहे. खरंतर गुलाब पाणी त्वचेच्या छिद्राना आतून स्वच्छ करण्यास तसेच मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय तेलकट त्वचा असणाऱ्यांना मुरुमांची समस्या असते. त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे. मुरूमांच्या जिवाणूसाठी हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्यामुळे ते कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते
रात्री काही वेळ गुलाब पाणी लावून चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेच्या आत उष्णता येथे आणि त्वचा आतून सुंदर दिसते. याशिवाय रोज रात्री असे केल्याने तुमची त्वचा आतून चमकते.
चेहऱ्याचा रंग उजळतो
अनेकांच्या चेहरा निस्तेज असतो. अशा परिस्थितीत गुलाब पाणी निस्तेजपणा कमी करून चेहरा उजळण्यास मदत करते. यासोबतच पिगमेंटेशन कमी होते, कोलेजन वाढवते त्यामुळे त्वचा आतून सुंदर दिसते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी थोड्या वेळ काढून कॉटन बॉलवर गुलाब पाणी टाकून चेहऱ्यावर लावा. त्याचा सतत वापर केल्याने त्याचे अनेक फायदे चेहऱ्याला होतात.