‘सविता भाभी’ हद्दपार, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाला कॉपीराईटचा फटका

तब्बल 58 ठिकाणी 'सविता भाभी' या नावाचा उल्लेख म्यूट करावा लागणार (Savita Bhabhi Copyright Issue) आहे.

'सविता भाभी' हद्दपार, 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' चित्रपटाला कॉपीराईटचा फटका
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 11:54 PM

मुंबई : ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावाचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Savita Bhabhi Copyright Issue) आहे. या चित्रपटाच्या नावामुळे सध्या सोशल मीडियावर याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. या चित्रपटातील ‘सविता भाभी’ या पात्राच्या नावाचा उल्लेख हद्दपार होणार आहे. त्यापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला (Savita Bhabhi Copyright Issue) आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात ‘सविता भाभी’ हे पात्र आहे. या पात्राचा चित्रपटात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. मात्र हा उल्लेख आता टाळावा लागणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अंबरीश दरक आणि ‘सविता भाभी’ याचे काल्पनिक पात्राचे कॉपीराईट असणाऱ्या निलेश गुप्ता यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार तब्बल 58 ठिकाणी ‘सविता भाभी’ या नावाचा उल्लेख म्यूट करावा लागणार आहे.

‘सविता भाभी’ हे एका कॉमिकमधलं काल्पनिक पात्र आहे. या काल्पनिक पात्राचे कॉपीराईट निलेश गुप्ता यांच्याकडे आहे. कॉपीराइट्स माझ्याकडे असतानादेखील चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निलेश गुप्ता यांनी या पात्राच्या कॉमिक कॉपीराइटवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविली (Savita Bhabhi Copyright Issue) होती.

View this post on Instagram

Ashleel Udyog Mitramandal Trailer #6March #GT #twentytwenty #daintytwenty

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

अभिनेता आलोक राजवाडे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात ‘सविता भाभी’ या पात्राची व्यक्तीरेखा अभिनेत्री सई ताम्हणकर साकारत आहे. सईसोबत पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ हेही कलाकार पाहायला मिळणार आहे.

‘सविता भाभी… तू इथंच थांब’

काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या गल्लोगल्लीत, रस्त्या रस्त्यावर आणि चौकाचौकात ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’  असे होर्डिंग लावण्यात आले होते. या वाक्याशिवाय त्यावर काहीही न लिहिल्याने ते चर्चेचा विषय ठरले (Savita Bhabhi Copyright Issue) होते. मात्र त्यानंतर ते चित्रपटाच्या प्रमोशनकरिता करण्यात आलं होतं असही समोर आलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.