ह्यो पाहिला का “ऑडी चहावाला”, लक्झरी चहा एकदा पहा!

कॅमेऱ्यात कैद झालेली हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून ती सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की ही जाहिरात करायची एक नवीन टेक्निक आहे. हे काम सुरू करणारे तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत.

ह्यो पाहिला का ऑडी चहावाला, लक्झरी चहा एकदा पहा!
Audi car chaiwalaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 5:59 PM

मुंबई: इंटरनेटवर अनेक नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कथा समोर येत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे जो सर्वांना चकीत करणारा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला ऑडी कारमध्ये चहा विकताना दिसत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेली हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून ती सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की ही जाहिरात करायची एक नवीन टेक्निक आहे. हे काम सुरू करणारे तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. लक्झरी कारमधून चहा विकणे हे या तरुणाचे अनोखे मार्केटिंग तंत्र वाटते.

ashishtrivedii_24  याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाच्या ऑडीच्या मागे काही लोक उभे असल्याचे दिसत आहे. लक्झरी सेदान व्हिडिओमध्ये काही सेकंदांसाठी दिसत आहे, ज्याचे रुपांतर एका दुकानामध्ये करण्यात आले आहे जिथे चहा बनवला जात आहे. एका टेबलावर चहा आणि इतर पेये दिली जात आहेत.

इंटरनेटवर शेअर केल्यानंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आता हजारो लाईक्स आणि 361 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय या शॉर्ट क्लिपवर सोशल मीडिया युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. महागड्या लक्झरी कारमधून चहा विकण्याच्या बिझनेस आयडियाने अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले होते.

एका सोशल मीडिया युजरने या पोस्टवर कमेंट करत याला बिझनेस असं नाव देत ‘ऑडी चायवाला’ असं नाव दिलं आहे. तर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सने सांगितले की, या व्यक्तीने ऑडी खरेदी केली आणि आता कारचा ईएमआय भरण्यासाठी चहा विकत आहे. तर इतर युजर्सनी सांगितले की, कारचा मालक ऑडीकडून चहा विकून मर्सिडीज-बेंझ खरेदी करण्याचा विचार करत आहे. तर आणखी एका युजरने या व्यक्तीने चहा विकून कार खरेदी केली आहे की उलट आहे? असा प्रश्न विचारलाय.

साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.
India's Got Latent Show वादाच्या भोवऱ्यात, सायबर विभागानं थेट सांगितलं
India's Got Latent Show वादाच्या भोवऱ्यात, सायबर विभागानं थेट सांगितलं.
सावंतांवर गुन्हा दाखल होणार?पोरगा लँड पण टेकऑफ झालेला वाद जमिनीवर नाही
सावंतांवर गुन्हा दाखल होणार?पोरगा लँड पण टेकऑफ झालेला वाद जमिनीवर नाही.