Aurangabad: नवउद्योजकांना चालना देण्यासाठी मॅजिक आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

नवउद्योजक युवक आणि युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सध्याचा व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आर्थिक सहाय्याकरिता आता आणखी पाठबळ दिले जाणार आहे. मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) आणि ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ या संस्थेमध्ये मंगळवार 14 डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे

Aurangabad: नवउद्योजकांना चालना देण्यासाठी मॅजिक आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार
मॅजिक आणि बीवायएसटी संस्थेत सामंजस्य करार
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 4:17 PM

औरंगाबादः नवउद्योजक युवक आणि युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सध्याचा व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आर्थिक सहाय्याकरिता आता आणखी पाठबळ दिले जाणार आहे. मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) आणि ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ या संस्थेमध्ये मंगळवार 14 डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत प्रदेशातील तरुण नवउद्योजनकांना चालना देण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी दोन्ही संस्था एकत्र येऊन काम करणार असल्याचे मत भारतीय युवा शक्ती ट्रस्ट संस्थेच्या ऑपरेशन्स डायरेक्टर निताशा अग्रवाल आणि मॅजिकच्या संचालिका मैथिली तांबोळकर यांनी व्यक्त केले.

उद्योजकांच्या पाठीशी मॅजिकचे बळ

मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) ही संस्था गेल्या 5 वर्षापासून भारतातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेसाठी मजबूत संस्कृती आणि सर्वसमावेशक स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्याकरिता काम करत असल्याचे मॅजिकच्या संचालिका मैथिली तांबोळकर म्हणाल्या. 18 महिन्यांच्या इन्क्युबेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 28 स्टार्टअप्सना मॅजिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, 150 अधिक नवउद्योजकांना मेन्टॉरिंग करण्यात येत आहे. या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही संस्था युवा उद्योजकता विकास प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये युवा नवउद्योजक निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करणार आहे, याकरिता संयुक्तपणे जागरूकता अभियान राबविणे, इन्क्युबेशन प्रक्रियेतील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, त्या म्हणाल्या.

मॅजिक या संस्थेने आतापर्यंत देशपातळीवर 46 नामवंत संस्थांशी सामंजस्य करार केले आहे तसेच मागील 2 महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ-लोणेरे, देवगिरी इलेक्ट्रोनिक क्लस्टर-औरंगाबाद, एमआयटी महाविद्यालय – औरंगाबाद, लघु उद्योग भारती – महाराष्ट्र, आम्ही उद्योगिनी आणि देआसरा फौंऊडेशन, पुणे या संस्थांसोबत स्टार्टअप वाढीकरिता सामंजस्य करार केले आहे.

1992 साली स्थापन झाली भारतीय युवा शक्ती ट्रस्ट

संस्थेबद्दल माहिती सांगताना निताशा अग्रवाल म्हणाल्या, 1992 साली स्व. श्री. जे.आर. डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना झालेली भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST) ही संस्था भारतीय तरुणांना त्यांच्या व्यावसायिक कल्पनांना फायदेशीर उपक्रमांमध्ये रुपांतरित करण्यासाठी काम करते. तसेच विविध उद्योगांसाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकाच्या पाठिंब्याने सक्षम राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी काम करते. औरंगाबाद आणि वर्धा येथील क्लस्टर्स बजाज ग्रुपच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून काम करीत असून, या क्लस्टर्समध्ये 1000 पेक्षा अधिक नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्यामार्फत 54 कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला असल्याचे माहिती या प्रकल्पाचे प्रमुख सचिन जोशी यांनी दिली.

इतर बातम्या-

Pune : इम्पेरिकल डेटा तंतोतंत आणि विश्वासार्ह असण्यावर देणार भर, चंद्रलाल मेश्राम यांचे मत

Video: ‘माकडाला कळतं, कसं खायचं, तुला नाही!’, माकडाचा व्हिडीओ पाहून मित्रांना टॅग करणं सुरु!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.