औरंगाबाद। जिल्ह्यातील सहकारी दूध संघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत उत्कंठावर्धक होत असून मंगळावारी यासाठी मोठी राजकीय खलबतं घडली. मंगळवारी या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. संघाचे विद्यमान अध्यक्ष व भाजप नेते आ. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दूध संघात रात्री उशीरापर्यंत ठाण मांडून प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. फक्त पैठण मतदार संघातून विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे यांची निवड होऊ शकली. 74 पैकी 53 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. एकूण 14 पैकी 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. आता उर्वरीत जागांसाठी येत्या 22 जानेवारी रोजी मतदान होईल.
दूध संघातील सात मतदारसंघातील संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
पैठण- विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे
सिल्लोड- श्रीरंग साळवे
गंगापूर- दिलीप निरफळ
खुलताबाद- सविता आधाने
सोयगाव- सुमित्रा चोपडे
ओबीसी मतदारसंघ- राजेंद्र जैस्वाल
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- इंदूबाई सुरडकर हे विजयी झाले.
येत्या 22 जानेवारी रोजी दूध संघातील उर्वरीत सात जागांसाठी निवडणूक होईल. विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवडणूक होण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र सुरेश पठाडे यांनी बागडे यांच्याविरोधातला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे बागडे यांनीदेखील फुलंब्रीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांचे समर्थक संदीप बोरसे यांच्याविरुद्धचा राजेंद्र पाथ्रीकर यांचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे आता औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, वैजापूर या तुलका मतदारसंघांच्या जागांसाठी निवडणूक होईल.
इतर बातम्या-