हार्सूल कारागृह हादरले | कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण, सात दिवसात पाच रुग्ण
औरंगाबादमधील हार्सूल कारागृहात सात दिवसात पाच कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने प्रशासन हादरले आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आता कारागृहातील कैदीही कोरोनाबाधित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारागृहात कोरोना रुग्ण सापडल्याने कैद्यांमध्येही कोरोनाच रुग्ण सापडण्याची शक्यता आहे.
औरंगाबादः औरंगाबादमधील हर्सूल कारागृहातील पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने कारागृह प्रशासन हादरले आहे. गेल्या सात दिवसात कारागृहातील पाच कर्मचारी कोरोना (Corona) पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. त्यामुळे आतमध्ये असलेल्या कैदेही आता पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनासह कैद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हर्सूल कारागृहात कैद्यांची संख्या अधिक आहे. कारागृहातीलच कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याने कैद्यांनाही कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा लागण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सात दिवसात पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशानावरील ताण वाढला आहे.
सध्या शहरीतील अनेक भागात गर्दी होत असते. अनेक ठिकाणांवरून व परराज्यातून येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्य सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. बाजार, राजकीय बैठका आणि प्रवास मोठ्या प्रमाणात होत आहेत. ग्रामीण परिसरात तर कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. मास्क, सॅनिटायझर, कोरोनासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नियमावली नागरिकांकडून पाळण्यात येत नाही.
हर्सूल कारागृहही चिंताग्रस्त
कारागृहातीतील कर्मचारी आणि कैद्यांना कोरोनाचील लागण झाली तर अनेक प्रश्न निर्माण होणारे आहेत. कैदी जर मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या उपचाराचा प्रश्न गंभीर होणार आहे. सध्या औरंगाबादमधील हर्सूल कारागृहही कोरोनामुळे चिंताग्रस्त झाले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने अजून रूग्ण सापडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
कारागृहामध्ये अधिक वय झालेले कैदी असतील तर त्यांंच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाच कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र ठेवण शक्य असले तरी जर कैद्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचे परिणाम वाईट असणार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे कारागृह प्रशासनावर प्रचंड ताण वाढला आहे.
संबंधित बातम्या