Aurangabad | नारेगावचे कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी मनपाचा अॅक्शन प्लॅन, बायोमायनिंग प्रक्रिया करणार, लवकरच निर्णय

| Updated on: Apr 11, 2022 | 6:00 AM

शहरांतील कचऱ्यावरील प्रक्रियेसंदर्भात विविध समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भारत मिशन 2.0 सुरु केले आहे. याअंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया संदर्भातील सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅन (सी-स्वॅप) केंद्राने मागवले आहेत.

Aurangabad | नारेगावचे कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी मनपाचा अॅक्शन प्लॅन, बायोमायनिंग प्रक्रिया करणार, लवकरच निर्णय
नारेगाव येथील कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यात येणार
Follow us on

औरंगाबाद | पाच वर्षांपूर्वी नारेगाव वासियांनी मोठे जनआंदोलन उभारल्यानंतर शहरातला कचरा तेथे टाकणे महापालिकेने बंद केले. त्यानंतर चिकलठाणा (Chikalthana) आणि पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प (Solid Waste Management) तसेच कांचनवाडी येथे बायोगॅस प्रकल्प उबारण्यात आले. शहरातील दररोज येथे 370 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र नारेगाव येथे साचलेल्या कचऱ्यांच्या डोंगरांचा प्रश्न जैसे थेच होता. हे कचऱ्याचे ढिगारे नष्ट करण्यासाठी अनेकदा चर्चा आणि नियोजनही करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. आता महापालिकेने (Aurangabad municipal Corporation) हा कचरा हटवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅन राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी मिळणार

केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत मिशनचा 1.0 हा टप्पा पूर्ण झाला आहे. आता शहरांतील कचऱ्यावरील प्रक्रियेसंदर्भात विविध समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भारत मिशन 2.0 सुरु केले आहे. याअंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया संदर्भातील सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅन (सी-स्वॅप) केंद्राने मागवले आहेत. त्यानुसार राज्यातील काही मोजक्याच महापालिकांनी राज्य शासनारडे अॅक्शन प्लॅन पाठवले असून त्यात औरंगाबाद महापालिकेनेही आपला प्रस्ताव पाठवला आहे. याअंतर्गत नारेगाव कचरा डेपो येथे पडून असलेला कचरा तसेच पडेगाव आणि चिकलठाणा येथे निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर बायोमायनिंगची प्रक्रिया करून ते नष्ट करण्याचे नियोजन आहे.

अॅक्शन प्लॅनवर कधीपर्यंत निर्णय?

राज्यातील विविध महापालिकांनी पाठवलेल्या अॅक्शन प्लॅनची राज्य शासनाच्या वतीने छाननी सुरु असून ते कामदेखील अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे काम पूर्ण होताच त्यात सूचवलेल्या त्रुटी दूर करून द्यावा लागतील. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर औरंगाबाद शहराचा सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅन अंतिम होईल. प्रशासकांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या माध्यमातून तो पुढे मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

बांधकामाच्या कचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागणार

सध्या औरंगाबाद शहरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. बांधकामातून निर्माण झालेल्या कचऱ्यावरही पर्याय काढण्यात आला आहे. मनपाने पाठवलेल्या सिटी सॉलिड वेस्ट अॅक्शन प्लॅनअंतर्गत मनपा सीएनडी वेस्ट याचाही प्रकल्पा शहरात उभारणार आहे. निधी मंजूर होताच हा प्रकल्पदेखील हाती घेतला जाईल, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

इतर बातम्या-

CM Uddhav Thackeray : ‘जाऊ दे! जीभ अडकायची माझी’ चंद्रकांत पाटलांवर टीका करताना असं का म्हणाले ठाकरे?

Thane Liqour : ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध गोवा मद्यावर कारवाई, एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त