औरंगाबादः महापालिकेतील नगरसेवकांची (Corporates) संख्या यंदा 15 टक्क्यांनी वाढणार असून हा आकडा 115 वरून 133 वर जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी होणाऱ्या बैठकीत याविषयीचा निर्णय होणार आहे. यात महापालिकेत (Aurangabad Municipal corporation) निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य शासनाने महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयावर राज्य निवडणूक आयोदाने शिक्कामोर्तब करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम सुरु करण्यात आले आहे. या रचनेचे काम झाल्यानंतर शासन आता महापालिकेत निवडून येणाऱ्या संदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेणार आहे.
आज बुधवारी मुंबईत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरविकास खात्याने प्रभाग रचनेसंबंधीचा तयार केलेला प्रस्ताव मांडला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीसाठीच्या विषयपत्रिकेवर महापालिकेतील सदस्य संख्या वाढवण्याचा प्रस्ताव नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या बैठकीत माहापालिकेतील सदस्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढण्याचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 115 वरून 133 वर जाईल. सध्या शहरातील पालिकेत 115 नगरसेवक आहेत.
शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला अनुभव अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीद्वारे 2011 मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, असे यात सांगण्यात आले आहे. शहरातील 115 वॉर्डांमध्ये एकूण 38 प्रभाग असतील. 3 वॉर्डांचे 37 तर आणखी एक प्रभाग 4 वॉर्डांचा असेल. ही तयारी सुरु झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-