Aurangabad | औरंगाबाद महापालिका प्रभाग आराखड्यावर 29 आक्षेप, 16 जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत, आत्तापर्यंतचे आक्षेप काय?

प्रभाग रचनेच्या आराखड्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 16 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 17 जून रोजी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती निवडणूक आयोगकाकडे पाठवल्या जातील. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे.

Aurangabad | औरंगाबाद महापालिका प्रभाग आराखड्यावर 29 आक्षेप, 16 जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत, आत्तापर्यंतचे आक्षेप काय?
औरंगाबाद महापालिका
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:54 AM

औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Aurangabad municipal Corporation) प्रभाग प्रारुप आराखड्यावर (ward structure) आतापर्यंत 29 आक्षेप आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. मनपाच्या 42 प्रभागांचा प्रारुप आराखडा 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार, 14 जूनपर्यंत 29 जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. आराखड्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 16 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 17 जून रोजी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती निवडणूक आयोगकाकडे (Election Commission) पाठवल्या जातील. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोगाकडे शिफारशी केल्या जातील. नव्याने केलेल्या प्रभागरचनेत अनेक प्रस्थापित नेत्यांच्या वॉर्डांचे विविध प्रभागांत विभाजन झाले आहे. त्यामुळे या विभाजनावर नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. भाजपनेही यापूर्वी आराखड्यावर आक्षेप नोंदवला आहे.

आतापर्यंतचे आक्षेप काय?

  • प्रभाग क्रमांक 42 या कांचनवाडी नक्षत्रवाडी, राहुलनगर, सादातनगर, ईटखेडा या प्रभागात तिरुपती एन्क्लेव्ह, ऑरेंज सिटी, गिरिजा शंकर विहार, जालान नगर, अप्रतिम घरकुल या भागांचा समावेश करावा
  • चतुःसीमांप्रमाणे चुनाभट्टी हा भाग प्रभाग क्रमांक 22 मध्ये येतो. मात्र हा भाग आता प्रभाग 23 मध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा भाग पुन्हा प्रभाग क्रमांक 22 मध्ये टाकण्यात यावा.
  • प्रभाग क्रमांक 7 मधून प्रगती कॉलनी वगळून बिस्मिल्ला कॉलनी हा भाग समाविष्ट करण्यात यावा
  • प्रभाग क्रमांक 5 मध्ये जयसिंगपुरा भागातील मतदारांचा समावेश करावा
  • विजयश्री कॉलनी प्रभाग क्रमांक 18 गुलमोहोर कॉलनीत समाविष्ट करावा
  • प्रभाग क्रमांक 22 राजाबाजर, नवाबपुरा, औरंगपुरा या प्रभागाची व्याप्ती आणि प्रभागाच्या सीमांमधील तफावती दूर कराव्यात
  • संजय नगर गल्ली क्रमांक 10 ही एकच गल्ली प्रभाग 34 आणि 35 मध्ये समावि्ट करण्यात आली आहे. याबद्दलही आक्षेप आहे.
  • प्रभाग रचनेवर राजकीय दबाव असून यातील फेरबदल जाणीवपूर्वक केले असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे.

शिवसेना नेते खैरेंची तक्रार काय?

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणुकूक आयोगाकडे तक्रार केली आहे. औरंगाबाद महापालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर होण्यापूर्वीच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा गोपनीयतेचा भंग असल्याने आराखडा नव्याने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आराखडा सादर करताना तो पाहण्यास अधिक स्पष्ट आणि सोपा जावा, याकरिताही त्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.